Nagpur Political News : भाजप केवळ मतांसाठी रिपब्लिकन पक्षाचा दहा वर्षांपासून वापर करीत आहे. लोकसभेत एकही जागा दिली नाही. विधानसभेच्या निवडणुकीतही बोळवण केली. त्यामुळे कमळाचे काम करणार नाही, असा इशारा रिपाइं (आठवले) राष्ट्रीय संघटक भूपेश थुलकर यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना दिला होता. त्यांनी आठवले यांना महायुतीबाबत आपली भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून थुलकर यांनी आठवलेंना जयभीम ठोकला आहे.
एकाच पक्षात राहून वेगवेगळी भूमिका घेणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. हा आठवले यांना मोठा झटका मानला जात आहे. दलित पँथरपासून भूपेश थुलकर हे रामदास आठवले यांच्या सोबत होते.
भाजपसोबत (BJP) युती करतानाही ते सोबत होते. त्यावेळी थुलकर रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष होते. रिपाई आणि भाजप युतीच्यावेळी थुलकर यांनी तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याच एक करार झाला होता. मात्र, त्या कराराचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन थुलकर यांनी केला होता.
राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात पाच वर्षे राज्यात भाजपचे सरकार होते. अडीच वर्षांपासून महायुतीचे राज्यात सरकार आहे. मात्र सुमारे साडेसात वर्षांच्या कार्यकाळात भाजपने रिपाइंच्या एकाही पदाधिकाऱ्याला साधे महामंडळ दिले नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर किंवा पंढरपूर यापैकी एक जागा सोडण्याची रिपाईला सोडण्याची मागणी केली होती. स्वतः रामदास आठवले येथून लढण्यास इच्छुक होते. मात्र ती नाकारण्यात आली.
विधानसभेच्या निवडणुकीत काही जागा दिल्या जाईल अशी आशा होती. मात्र तीसुद्धा फोल ठरली आहे. मुंबईतील जो मतदारसंघ मागीतला नाही तो दिल्याचे सांगण्यात आले. येथील उमेदवार भाजपने स्वतःच्या इच्छेने ठरवला तोसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याचे थुलकर यांचे म्हणणे आहे.
भाजपच्या तुलनेत काँग्रेस आघाडीने रिपाइंचा आदर केला. महामंडळे दिली. काही मतदारसंघ सोडले होते, याकडे लक्ष वेधून थुलकर यांनी आता आठवले यांनी महायुतीसोबत राहायचे की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची जाहीर मागणी केली होती.
सोबतच त्यांनी आम्ही कमळाचे काम करणार नाही, असेही स्पष्ट केले होते. मात्र आठवले यांच्याकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पक्षपदाचा राजीनामा देऊन थुलकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.