APMC Election
APMC Election Sarkarnama
विदर्भ

APMC Mahagaon : महागाव बाजार समितीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीयांची वज्रमूठ !

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal District Mahagaon APMC Election : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची युती जुळून आली असली तरी कॉंग्रेसची केवळ तीन जागांवर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी वज्रमूठ बांधली असून बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार, हे निश्‍चित आहे. (The alliance of NCP and Indian National Congress came together)

बाजार समितीत राष्ट्रवादीचा निर्विवाद वरचष्मा आहे. तरीही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मनोहरराव नाईक यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची युती असावी, अशी भूमिका घेतली होती. काँग्रेसने १८ पैकी ७ जागांचा आग्रह धरला. परंतु शेवटी तीन जागांवर त्यांना समाधान मानले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस दुभंगली.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या युतीला आव्हान देण्यासाठी सर्वपक्षीय वज्रमूठ बांधण्याचा निर्धार करण्यात आला. भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे असंतुष्ट कार्यकर्ते, अशी आघाडी तयार करण्यात आली. वसंतराव नाईक सर्वपक्षीय शेतकरी सहकार विकास आघाडी हे पॅनल मैदानात उभे ठाकले आहे. श्री मनोहरराव नाईक शेतकरी विकास पॅनल या नावाने राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढत आहे.

मनोहरराव नाईक पॅनलमध्ये धोंडीराव बोरुळकर, संतोष अडकिने, शेषराव खंदारे, विनोद राऊत, दिगंबर राठोड, अ. वहाब अ. हलीम, अमरसिंग राठोड, कांताबाई राठोड, पुष्पा ठाकरे, विनोद सुरोशे, शेषराव पवार, आत्माराम गावंडे, उकंडा राठोड, पुंडलीक भुरके, रितेश पुरोहित, विजय महाजन, विनोद भगत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सर्वपक्षीय वसंतराव नाईक पॅनलमध्ये गुलाब जाधव, अंबादास भिमटे, गजेंद्र देशमुख, रामेश्वर करपे, वासुदेव नेवारे, किशोर देशमुख, राजेश राठोड, सुनंदाबाई गावंडे, निर्मला वानखेडे, निरंजन धनगर, कृष्णराव राऊत, दिनेश रावते, रवी पवार, संजय डोंगरे, परमेश्वर जाधव, सुरेश नरवाडे, सुचिता देशमुख आणि विजय पतंगे यांना उमेदवारी देण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रोहिदास घुगेवाड, नितीन नरवाडे, रमेश भुसारे, रवींद्र भारती, विशाल पांडे आणि संतोष मोरे हे सहा उमेदवार निवडणूक (APMC Election) रिंगणात उतरविले आहेत. आजच्या तारखेत राष्ट्रवादी प्रबळ पक्ष मानला जात आहे.

१८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात..

अर्ज मागे घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणूक (Election) रिंगणात उभे ठाकले आहेत. यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस युतीचे १८ सर्वपक्षीय पॅनलचे १८, शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे ६ आणि ६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT