Ramtek APMC Election : कॉंग्रेस नेत्याचा समावेश असलेली चार पक्षांची वज्रमूठ, सुनील केदारांना शह देणार का?

Nagpur : राजकारण यावेळेस अधिकच गरम झाले आहे.
Sunil Kedar - Ramtek APMC
Sunil Kedar - Ramtek APMCSarkarnama
Published on
Updated on

रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत केदार गटाला शह देण्यासाठी चार पक्षांनी एकत्र येऊन आघाडी बनविली आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. चार पक्ष एकत्र आल्याने रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीचे राजकारण यावेळेस अधिकच गरम झाले आहे.

सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते आमदार सुनील केदार यांनी रामटेक बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अधिकच लक्ष घातल्याने त्यांना शह देण्यासाठी चार पक्षांच्या नेत्यांनी आघाडी केली आहे. यासंदर्भात आजच नवीन आघाडीच्या नेत्यांनी माहिती दिली. या निवडणुकीत काँग्रेसच्या केदार गटाला शह देण्याचा प्रयत्न या आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

आघाडीमध्ये भाजप, प्रहार, गोंडवाना गणतंत्र पार्टी व कॉंग्रेस पक्षाचे उदयसिंह यादव यांनी एकत्रित येऊन शेतकरी विकास सहकार आघाडी तयार केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता एकाच गटाकडे आहे. पण पाहिजे तसा विकास झाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी नवी आघाडी काम करेल. विविध योजना राबविण्यात येईल.

कृषी उत्पन्न बाजार समिती एकाच गटाकडे असल्याने विकास खुंटला आहे. त्यामुळे बाजार समिती विविध समस्यांनी ग्रस्त आहे. सर्व शेतकरी, अडते, व्यापारी व विविध सहकारी संस्थांनी स्थानिक पातळीवर आघाडी तयार केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन घडवून येईल, असा दावा चार पक्षांच्या आघाडीने केला. माजी आमदार डी. एम. रेड्डी, प्रहार संघटनेचे रमेश कारामोरे, कॉंग्रेसचे उदयसिंह यादव, जिल्हा परिषद सदस्य तथा गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे हरीष उईके राजेश ठाकरे, संजय मुलमुले, राहुल किरपान, आलोक मानकर, रणवीर यादव हे या आघाडीची धुरा सांभाळणार आहेत.

Sunil Kedar - Ramtek APMC
MLA Deshmukh News : काहीही झाले तरी उद्या सकाळी फडणवीसांच्या घरासमोर टॅंकरसह धडकणार आमदार देशमुख !

केदार गटाविरोधात कॉग्रेसचे यादव..

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद, विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करणारे आणि विशेष म्हणजे नागपुरातील वज्रमूठ सभा यशस्वी करणारे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात कॉंग्रेसमधील उदयसिंग यादव यांनी दंड थोपटले आहे.

जिल्हा परिषदेच्या (ZP) अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काही जिल्हा परिषद सदस्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती. मात्र, आमदार केदार (Sunil Kedar) यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सर्वत्र वज्रमूठ होत असताना कॉंग्रेस (Congress) नेते उदयसिंग यादव यांनी केदार गटाविरोधात उघडउघड दंड थोपटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com