Ashish Deshmukh Farmer march sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh News : अजितदादांच्या मंत्र्यांची मविआतील नेत्यांना साथ, भाजप नेत्याने थेट नाव घेत केला आरोप

Ashish Deshmukh anil Deshmukh sunil kedar :सुनील केदार आणि दोषी संचालकांकडून पैशाची वसुली करण्यासाठी आशिष देशमुख यांनी रामटेकमध्ये तीव्र आंदोलन करत मोर्चा काढला होता.

Roshan More

Ashish Deshmukh News : महायुतीमधील अजित पवार गटाचे मंत्री महाविकास आघाडीच्या काळात मंत्री राहिलेल्या दोन माजी मंत्र्यांची मदत करत असल्याचा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. आशिष देशमुख यांनी थेट महायुतीमध्ये मंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे.

दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे मविआमधील माजी मंत्री सुनील केदार आणि अनिल देशमुख यांना मदत करत असल्याचा ठपका आशिष देशमुख यांनी ठेवला आहे.

नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करूनही सुनील केदार आणि इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात सुनावणीसाठी वळसे पाटील टाळाटाळ करतात, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.

सुनील केदार आणि दोषी संचालकांकडून पैशाची वसुली करण्यासाठी आशिष देशमुख यांनी रामटेकमध्ये तीव्र आंदोलन करत आज मोर्चा काढला होता.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याच्या विरोधात रामटेक येथे पिढीत शेतकरी आणि खातेधारकांच्या हक्कांसाठी जोरदार आंदोलन केले. न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवले असताना सुद्धा सहकार विभाग आणि सहकार मंत्र्यांच्या दिरंगाईने शेतकऱ्यांना डिवचले आहे, ही लढाई आता निर्णय टप्प्यात आली असून जोपर्यंत शेतकऱ्यांना आणि खातेदारकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा आशिष देशमुख यांनी दिला.

मुंडे अनिल देशमुखांचे ऐकतात

कृषी मंत्री धनंजय मुंडे हे मविआतील नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ऐकत असल्याची टीका आशिष देशमुख यांनी केली आहे. 12 सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक अचानक रद्द केली, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT