Vaibhav Naik : 'सरकारकडून जयदीप आपटेला अभय', ठाकरेंच्या शिलेदाराचा गंभीर आरोप

Chhatrapati Shivaji maharaj statue collapse Vaibhav Naik Jaydeep Apte : जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
Jaydeep Apte
Jaydeep Aptesarkarnama
Published on
Updated on

Vaibhav Naik News : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जयदीपला न्यायालयीन कोठडी मिळाल्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकार आणि पोलिसांकडून अभय देण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक म्हणाले.

'छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ 9 दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून सरकारकडून आणि पोलिसांकडून जयदीप आपटेच्या विरोधात मालवण न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्यानेच त्याला दिलासा मिळाला', असे वैभव नाईक म्हणाले.

Jaydeep Apte
NCP SP News : "चिंता करु नका, तासगावची सीट फिक्स पण..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या लेकाला केली 'ही' विनंती

जयदीप आपटेची अटक ही प्रीप्लॅन असण्याची शक्यता असून या घटनांवरून सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह खाते आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्या संगनमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

वैभव नाईक आक्रमक

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक हे आक्रम झाले आहेत. त्यांनी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. तसेच पुतळा कोसळ्यानंतर नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जात तोडफोड केली होती.

Jaydeep Apte
Video Amol Kolhe : महाराष्ट्रात 'साहेब' कोण? अजितदादांना प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हेंनी सांगितली दोन नावं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com