Mahayuti News : विदर्भात महायुतीला मोठा धक्का? सर्व्हेमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा ?

Political News : विदर्भात भाजपने नुकताच एकअंतर्गत सर्व्हे केला आहे. यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत महाविकास आघाडी कमबॅक करीत असल्याने भाजपचये चिंतेत भर पडली आहे.
Mahayuti Politics
Mahayuti Politics Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आमदारांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. भाजपने बालेकिल्ला असलेल्या विदर्भात विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

विदर्भात भाजपने नुकताच एकअंतर्गत सर्व्हे केला आहे. यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत महाविकास आघाडी कमबॅक करीत असल्याने भाजपचये चिंतेत भर पडली आहे. (Mahayuti News)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी विदर्भात करण्यात आलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भातील एकूण 62 जागंपैकी महायुतीला फक्त 25 जागा मिळत असल्याचे समजते. त्यामध्ये भाजपला 18, तर शिवसेनेला 5 आणि राष्ट्रवादीला 2 अशा एकूण २५ जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली .

लोकसभेप्रमाणेच येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार आहे. विदर्भात एकूण 62 जागंपैकी भाजपला 18 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Mahayuti Politics
NCP News : मोठी बातमी! अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 25 उमेदवार ठरले, बारामतीतून कोण?

भाजपला विदर्भात 62 पैकी 2014 मध्ये 42 तर 2019 मध्ये 29 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2019 मध्ये 5 आमदार निवडून आले होते. त्यात चार जागा अजित पवार यांच्याकडे होत्या, तर शिवसेनेकडे 2019 मध्ये 3 जागा होत्या. तर 3 अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला साथ होती. त्यामुळे विदर्भात शिंदे शिवसेनेकडे 6 आमदार आहेत.

नागपूर जिल्ह्यात भाजपला 12 पैकी फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातील 62 पैकी 39 आमदार आहेत. तर नागपूर जिल्ह्यात 12 पैकी भाजपला फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. 2019 मध्ये 7 आमदार भाजप महायुतीकडे होत्या.

विदर्भात महायुतीमध्ये जागावाटपात रस्सीखेच सुरु आहे. महायुतीमध्ये जवळपास 40 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे. त्यामुळे हा जागावाटपाचा तिढा राज्यात सुटणार की तोडगा काढण्यासाठी दिल्लीला जावे लागणार यायची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Mahayuti Politics
Ramdas Athawale News : राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com