Mahayuti Government .jpg Sarkarnama
विदर्भ

Ashish Jaiswal News : ...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनं एकत्रित लढवाव्यात; शिंदेंच्या मंत्र्यांनी सांगितलं कारण

Mahayuti Government : महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत करण्यात आली आहे. याची आकडेवारी उपलब्ध आहे. चॅट जीपीटीला विचारले तरी ते सांगले असे सांगून जैस्वाल यांनी विरोधकांना टोला लागावला.

Rajesh Charpe

Nagpur News: संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते काहीही बोलतात आणि लिहतात. भविष्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यापासून सावध राहावे असा सल्ला देऊन राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी छगन भुजबळ तुमच्याही मंत्रिमंडळात होते, तेव्हा तोंडाला कुलूप लावून का बसले होते अशा शब्दात संजय राऊतांना फटकारले.

तसेच छगन भुजबळ मंत्री झाल्यापासून संजय राऊत (Sanjay Raut) महायुती सरकारच्या विरोधात रोजच टीका-टिप्पणी करत आहेत. भुजबळांवर आरोप करत आहेत. याचा चांगलाच समाचार आशिष जैस्वाल यांनी घेतला.

छगन भुजबळ शिवसैनिक असताना त्यांना चालत होते. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये ते मंत्रीसुद्धा होते. त्यावेळी संजय राऊत यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. महायुती सरकारने मंत्री करताच ते वाईट कसे झाले? स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी ते काहीही बोलत असतात. त्यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही. आमच्याच भरवशावर खासदार झाले. त्यामुळे त्यांना लोकनेता म्हणण्याचा त्यांना अधिकारच नाही,नसल्याचंही शिवसेना (Shivsena) आमदार जैस्वाल यांनी सांगितलं.

आपली खासदारकी टिकवण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाट लावली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतरही राऊतांचे धंदे बंद झाले नसल्याची झणझणीत टीकाही जैस्वाल यांनी केली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका महायुतीने एकत्रित लढवाव्यात, अशी माझी भावना आहे.

कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करत असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्याची इच्छा असते. त्यांनाही स्थान मिळावे यासाठी स्वबळावर लाढवे अशी भावना ते व्यक्त करीत असतात. यात वाईट काही नाही. इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या बघून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते

निवडणूक जाहीर झाल्यावर याचा निर्णय घेतला जाईल. निवडणुका केव्हा आणि कशा घ्यायचा हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. आयोग जेव्हा निवडणूक जाहीर करतील त्यासाठी आम्ही तयार असल्याचे आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत करण्यात आली आहे. याची आकडेवारी उपलब्ध आहे. चॅट जीपीटीला विचारले तरी ते सांगले असे सांगून जैस्वाल यांनी विरोधकांना टोला लागावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT