Rohit Pawar News : 'चाकणकरांनी बाजूला व्हावं...'; रोहित पवारांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नवं नावही सुचवलं

Maharashtra Politics : आगामी निवडणुकांसाठीची तयारी आमच्याकडून सुरू आहे. मात्र, त्यामध्ये अधिक सुसूत्रता यावी यासाठी येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे.
Rupali Chakankar,Rohit Pawar
Rupali Chakankar,Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये महिला आयोगाने योग्य भूमिका घेतली नाही असा आरोप करत विरोधकांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना घेरलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर सातत्याने महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी जोर धरत असल्याचा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

पुण्यामध्ये शनिवारी (ता.31) माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, महिला आयोगाचे अध्यक्षपद देत असताना माजी पोलीस अधिकारी, माजी न्यायाधीश, माजी सनदी महिला अधिकारी यांचे बॅकग्राऊंड चेक करून ज्या व्यक्तीचं कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही अथवा त्यांचा कोणताही राजकीय पक्षाशी संबंध नाही अशा व्यक्तीला महिला आयोगाचे अध्यक्ष करणं अत्यंत संयुक्तिक ठरणार आहे. महिला आयोगाच्या पदावर कोणीही राजकीय व्यक्ती नसावा अशी आमची भूमिका आहे, असं केल्यास महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं रोहित पवार म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत, ते एखाद्या राजकीय पक्षाच्या निगडित असल्याने महिला आयोग हा पक्षाचीच एक वेगळा विभाग असल्याप्रमाणे या आयोगाला चालवत असेल तर ते अत्यंत चुकीचा आहे.

आगामी अधिवेशनामध्ये याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित करणारा असून आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नियमावली तयार करावी अशी आमच्या मागणी असणार आहे. नियमावली तयार करून राजकीय व्यक्ती या ठिकाणी अध्यक्ष व्हावा याबाबत आमची ठाम भूमिका असणार आहेत, असा आयोगांवर्ती राजकीय व्यक्ती आल्यानंतर राजकारण होणार हे निश्चित त्यामुळे या ठिकाणी बॅकग्राऊंड चेक करून माजी महिला अधिकाऱ्यांनाच या ठिकाणी प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी असणार आहे.

Rupali Chakankar,Rohit Pawar
Gokul Dairy : गोकुळच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मुश्रीफ... भाजपमध्ये असूनही 'अंबरिश घाटगे' यांचा 'गेम' कसा झाला?

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा (Rupali Chakankar) राजीनामा घ्यायचा की नाही हा सध्याच्या सरकारचा प्रश्न आहे. मात्र, सद्य परिस्थितीला ज्या गोष्टी घडत आहेत आणि ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या ठिकाणी महिला आयोगाने भूमिका घेण्याची आवश्यकता होती. मागील काही प्रकरणांमध्ये आयोग कमी पडला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्याचा जनमत पाहता सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा देणे योग्य ठरेल असं रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या पक्षातील नवी पिढी भाजपसोबत जाण्यास उत्सुक असल्याचा अंदाज व्यक्त होत असताना, यावर विचारलेले प्रश्न आणि त्यावर संजय राऊत यांनी "तहान लागली असली तरी कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही," असा खोचक टोला त्यांनी लगावत भाजपकडे झुकणाऱ्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Rupali Chakankar,Rohit Pawar
BJP News : 'डॉक्टर' कराडांचे इंजेक्शन लागू पडले; भाजपाच्या शहराध्यक्षपदी किशोर शितोळे!

कोणत्या डबक्यात उडी घ्यायची हे ज्यांनी तहानलेत त्यांनी ठरवावं लागेल, पण जिथे आधीच लाटांमध्ये गर्दी आहे, तिथे अस्तित्व टिकवणं सोपं नाही. जे गेलेत, तेच सध्या तिथे धडपडतायत. मग नवे जाऊन काय करणार?" असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला.

स्थानिक स्वराज यांच्या निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, आगामी निवडणुकांसाठीची तयारी आमच्याकडून सुरू आहे. मात्र, त्यामध्ये अधिक सुसूत्रता यावी यासाठी येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवीन येणारी कार्यकारणी शरद पवार यांच्याशी चर्चा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवेल असं रोहित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com