Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu: 'जरांगे नसले, तरी आमची बॅटिंग लाईन मजबूत'; युती-आघाडीला बच्चू कडू यांचा इशारा

Bachchu Kadu on Manoj Jarange Decision: मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतल्याच्या निर्णयावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया.

Rajesh Charpe

Nagpur News : मनोज जरांगे यांनी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे, तर काहींचे राजकीय आराखडे बदललेत. आता त्यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जरांगे यांच्या माघारीतून तिसऱ्या आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कयास लावल्या जात आहे. असे असले तरी तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी कोणी कसेही चेंडू टाकले, वळवले तरी आमची बॅटिंग मजबूत असल्याचे सांगून महाविकास आघाडी आणि महायुतीला आमची फटकेबाजी आणि फरफेक्ट टायमिंग निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा दिला.

माघारीसाठी मनोज जरांगे यांच्यावर राजकीय दबाव होता का, यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मला वाटत नाही, असे उत्तर दिले. "तो दबावाला बळी पडणार माणूस नाही. मनोज जरांगेच्या माघारीमुळे कोणाचा फायदा होईल, याचे कुठलेही मोजमाप यंत्र नाही. ग्राउंडवरची राजकीय परिस्थिती वेगळी असते. जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीला पाठिंब्याबाबतचा निर्णय संभाजी राजे घेतील. पाठिंबा दिला तरी फायदा होतोच. मात्र आमच्या विरोधकांनी कसेही चेंडू टाकले तरी आमची बॅटिंग लाईन मजबूत आहे", असे बच्चू कडू यांनी सांगितले.

कुठल्याही एका जातीवर राजकारण करता येत नाही, निवडणूक जिंकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्व राजकीय पक्ष धर्म आणि जातीवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यांच्याकडे धनशक्ती आहे. पैशाच्या जोरावर सर्व राजकीय पक्षांनी राजकारणाची व्याख्या बदलून टाकली असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीत (Election) जरांगे यांच्या आंदोलनाचा महायुतीच्या उमेदवारांना चागंलचा फटका बसला होता. यानंतर जरांगे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता. महायुतीचे उमेदवार पाडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

तिसऱ्या महाघाडीत जरांगे यांनी सहभागी व्हावे, असेही प्रयत्न केले जात होते. तिसऱ्या आघाडीचे नेते संभाजी राजे आणि राजू शेट्टी यांनी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र आज जरांगे यांनी अचानक निर्णय बदलला. आपल्या उमदेवारांना अर्ज माघे घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आता त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT