Nagpur Congress News : मुळकांच्या बंडखोरीला काँग्रेसचाच पाठिंबा?

Political News : रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याशी अद्याप एकाही काँग्रेस एकाही बड्या नेत्याने संपर्क साधला नसल्याचे समजते.
Ashish jaiswal, Vishal Barbate, Rajendra Mulak
Ashish jaiswal, Vishal Barbate, Rajendra Mulak Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील बुहतांश विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसने बंडखोरी केली आहे. त्यांना बसवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन केले आहे. मात्र अद्यापही यास कोणी प्रतिसाद दिलेला नाही.

रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक (Rajendra Muluk) यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याशी अद्याप एकाही काँग्रेस एकाही बड्या नेत्याने संपर्क साधला नसल्याचे समजते. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला अद्याप दोन दिवस शिल्लक असले तरी मुळकांनी आपला प्रचार सुरू ठेवला असल्याने ते माघार घेतील असे दिसत नसल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. (Nagpur Congress News)

रामटेक विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने सोडला आहे. येथून उद्धव सेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीचे आमदार आशिष जयस्वाल उमेदवार आहेत. या मतदारसंघात मुळक दहा वर्षांपासून काम करीत आहेत. आजवर शिवसेना विरुद्ध काँग्रेस (Congress) अशीच लढत येथे होत होती. मात्र आघाडीमुळे मुळक यांची अडचण झाली.

हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा यासाठी शेवटपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री व जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि स्वतः मुळक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेच्या नेत्यांना विनंती केली. मात्र सर्व वाटाघाटी फिस्कटल्या. शिवसेनेने रामटेक सोडण्यास नकार दिला.

Ashish jaiswal, Vishal Barbate, Rajendra Mulak
Vidhansabha Election : प्री-पोल सर्व्हेत कोणाचे पारडे जड; महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार ?

त्यामुळे मुळक यांनी बंडोखोरी केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला खासदार बर्वे यांच्यासह काँग्रेसचे सर्वच प्रमुख पदाधिकारी सोबत होते. हे बघता काँग्रेसचाच मुळकांना पाठिंबा असल्याचे दिसून येते. याशिवाय त्यांना उमेदवारी मागे घ्यावी यासाठी कुठल्याचा हालचाली होताना दिसत नसल्याने ते शंभर टक्के लढतील, असे आजचे चित्र आहे.

रामटेकमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुकाबला होत आहे. मात्र, मुळक यांच्यामुळे येथे आता तिरंगी लढत झाली आहे. मुळक यांच्यासह उमरेड आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघ, शहरातील पूर्व नागपूरमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोरांनी उमेदवारी दाखल केली आहे.

Ashish jaiswal, Vishal Barbate, Rajendra Mulak
MVA Nagpur : शरद पवारांनी पंढरपूर, हिंगणा घेतले, आता पूर्व नागपूरचे काय होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com