BJP Politics : ठाकरेंनी मागितली उमेदवारी, भाजपने केले निवडणूक प्रभारी

Avinash Thakre BJP katol assembly constituency : अविनाश ठाकरे यापूर्वी काटोल विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक होते. तेव्हापासून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठाकरे यांनीसुद्धा या मतदारसंघावर दावा केला होता.
Avinash Thakre Devendra Fadanavis
Avinash Thakre Devendra Fadanavissarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी भाजपात अनेकांनी उमेदवारी मागितली होती. शेवटपर्यंत यासाठी रस्सीखेच सुरू होती. माजी आमदार आशिष देशमुख यांनी प्रचारसुद्धा सुरू केला होता. शेवटच्या क्षणी त्यांना काटोलमधून सावनेर विधानसभा मतदारसंघात पाठवण्यात आले आणि चरणसिंग ठाकूर यांना भाजपने उमेदवार घोषित केले.

काटोलमधून प्रबळ दावेदारांपैकी एक असलेले अविनाश ठाकरे यांना आता त्याच मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील जातीय समिकरण ठाकरे यांच्या नियुक्तीने साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अविनाश ठाकरे यापूर्वी काटोल विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक होते. तेव्हापासून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठाकरे यांनीसुद्धा या मतदारसंघावर दावा केला होता. या मतदारसंघातून माजी आमदार आशिष देशमुख यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र ते मध्येच भाजप सोडून गेले होते.

Avinash Thakre Devendra Fadanavis
Sada Sarvankar Video : मोठी बातमी!...तर सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार

आशिष देशमुख पुन्हा काटोल मतदारसंघात सक्रिय झाले होते. मात्र2019 च्या निवडणुकीत अनिल देशमुख यांच्याशी लढत देणारे चरणसिंग ठाकूर यांच्यावरच पुन्हा भाजपने दाव लावला आहे. ठाकरे यांना निवडणूक प्रभारी म्हणून नेमून पक्षाने युवा कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. ठाकरे नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच भाजपचे सत्तापक्षनेते होते.

काटोलमध्ये यावेळी अनिल देशमुख देशमुख मैदानात नाही. त्यांच्या ऐवजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीने आणखी एका अनिल देशमुख यांना शोधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. त्यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले असल्याने मतविभाजनाच मोठा धोका शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलील देशमुखांना निर्माण झाला आहे.

(Edited By Roshan More)

Avinash Thakre Devendra Fadanavis
Prashant Kishor on Party Symbol : प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं, पक्षाचं निवडणूक 'चिन्ह स्कूल' बॅग का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com