Bawankule Vs Thackeray Sarkarnama
विदर्भ

Bawankule Vs Thackeray : 'मातोश्री'वरून वचननामा प्रकाशित; बावनकुळे म्हणाले, "उद्धवजी निवडणुकीत तरी..."

Criticism of BJP Chandrashekhar Bawankule as soon as ShivSenaUBT Vachanama was published from Matoshree : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वचननामा मातोश्रीवर प्रकाशित करतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

Rajesh Charpe

Nagpur News : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे काधी मंत्रालयात फिरकले नाहीत. सर्व कारभार घरात बसून केला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचनामासुद्धा उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री'तून जाहीर केला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अडीच वर्षे घरातून फेसबुक लाईव्ह केले. किमान निवडणुकीत तरी त्यांनी घराबाहेर पडणे अपेक्षित होते. उद्धवजी, नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो", असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीत जाणे भाजपला चांगलेच जिव्हारी लागले आहे. सत्तेसाठी त्यांची हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपतर्फे (BJP) वारंवार केला जात आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे 'मातोश्री'च्या बाहेर पडले नाही. मंत्रालयात कधीच गेले नाही. राज्याचा कारभार 'मातोश्री'त बसून फेसबुकवरून केल्याचा आरोप भाजप नेत्यांचा आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामासुद्धा त्यांनी 'मातोश्री'तच जाहीर केल्याने भाजपला टीकेची आणखी एक संधी मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स'वरून त्यांच्यावर निशाणा साधला.

"बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे हित होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फक्त आपल्या कुटुंबाचे हित बघत आहेत. नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. अडीच वर्षे फक्त 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरते राजकारण केले", अशी टीका बावनकुळे यांनी केली.

"सत्ता हातची गेल्यानंतरही घरात बसून कारभार करायची त्यांची सवय सुटली नाही. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचे हित होते. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आपल कुटुंब आणि कुटुंबच आहे. याच कारणामुळे सच्चा शिवसैनिक त्यांना सोडून गेले. यामुळे त्यांना उबाठाचा वचननामा घरीच प्रकाशित करण्याची वेळ आली आहे", असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT