Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Rahul Narvekar News : महाराष्ट्राला न्याय देण्याची सद्बुद्धी दे; राहुल नार्वेकरांचे महाकालीला साकडे...

Maharashtra Politics News : न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही...

Mangesh Mahale

Chandrapur Political News : अद्यापही सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर कडक ताशेरे ओढले आहेत. या मुद्द्यावरून नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. नार्वेकरांच्या निकालावर राज्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे. या निकालाकडे देशाचे लक्ष आहे.

नार्वेकर आज (गुरुवारी) चंद्रपुरात महाकाली यात्रा महोत्सवात उपस्थित होते. 'राज्याला न्याय देण्यासाठी सद्बुद्धी दे'असे साकडे महाकालीला घातल्याचे नार्वेकरांनी सांगितले. चंद्रपुरात आजपासून सुरू होणाऱ्या देवी महाकाली महोत्सवाच्या उद्घाटनाला राहुल नार्वेकर चंद्रपुरात आले आहेत. मंदिर प्रशासनाकडून कालिका मातेची ओढणी, नारळ देऊन नार्वेकरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नार्वेकर यांनी महाकालिकेची पूजा केली.

नार्वेकरांनी माध्यमांशी बोलताना आमदार अपात्र प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. "न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही," असे नार्वेकर म्हणाले. "देवी महाकालीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आहे. देवीने मला महाराष्ट्राला न्याय देण्याची सद्बुद्धी द्यावी," अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, विधानसभेतील आमदार अपात्रताप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना शिवसेना ठाकरे गट सोडून विधान परिषदेतील तीन आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या तीन आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.

तीन आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, यासाठी ठाकरे गटाने मोठे पाऊल उचलले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर हे प्रकरण हाती घेतले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

विधान परिषदेतील आमदार नीलम गोऱ्हे, मनीष कायंदे, विप्लव बाजोरिया यांना अपात्र ठरविण्याचीही मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली होती. मात्र, त्याकडे विधिमंडळाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT