Tumsar Police Station Sarkarnama
विदर्भ

Bhandara News : चर्मकार समाजसेवा संघाचा वाद; माजी नगरसेवकाला मारहाण

Nagar Palika : समाजाच्या मालकी जागेवर नगर परिषदेचे अनधिकृत बांधकाम प्रकरण

अभिजीत घोरमारे

Tumsar : चर्मकार समाजाच्या जागेवर पदाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेच्या फंडाचा उपयोग करून अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा वाद आता चिघळला आहे. या वादातून एका माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे हा प्रकार घडला. माजी नगरसेवक तथा चर्मकार समाजसेवा संघाचे सचिव श्रीकांत भोंडेकर यांनी यांसदर्भात तक्रार केली आहे.

भोंडेकर यांनी यापूर्वी यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीच्या रागातून भोंडेकर यांच्यावर हल्ला चढविण्यात आला. हल्ल्यात भोंडेकर जखमी झाले. याप्रकरणी तुमसर पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. सुरेश कनोजे (वय 58), अमृत कनोजे (वय 56) या संत रविदासनगरात राहणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तुमसर येथे चर्मकार समाजसेवा संघ संस्था आहे. भंडाऱ्यातील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयात ही संस्था नोंदणीकृत आहे. संस्थेत 1992 मध्ये बदल करण्यात आले. संस्थेच्या नोंदणीकृत पदाधिकाऱ्यांकडून अथवा संस्थेकडून ना-हरकत प्रमाणपत्र न घेता नगर परिषदेचे समाजाच्या मालकीच्या जागेवर कोट्यवधी रुपयांच्या शासन फंडाचा वापर करीत अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. नगर परिषदेचे हे बांधकाम थांबविण्यात यावे. आतापर्यंत झालेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावे, अशी तक्रार सचिव भोंडेकर यांनी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील बांधकामास स्थगिती दिली. बांधकामाचे बिलही त्यांनी थांबविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रीकांत भोंडेकर हे हिवराज बिनझाडे यांचे चहाच्या दुकानावर असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. भंडारा कशाला गेले होते. संघाचे आक्षेपपत्र का लावले. राजीनामा का देत नाही, असे म्हणून शिवीगाळ करत बिनझाडे व भोंडेकर या दोघांना मारहाण करण्यात आली. त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

भोंडेकर म्हणाले की, हल्ला करणाऱ्या व्यक्तींना बांधकामाच्या बिलातून कमिशन मिळणार होते. त्यामुळे त्यांनी बांधकाम सुरू केले. हल्ला करणारे गुंड प्रवृत्तीचे असल्याने आपल्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. समाजातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तुमसर पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याच्या या घटनेसंदर्भात तुमसर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT