Bhandara : ‘तारीख पे तारीख’ने भावी नगरसेवकांना बनविले कंगाल

Local Body Elections : पालिकांची निवडणूक प्रक्रिया लांबल्याने नेते हिरमुसले
Local Boty Elections.
Local Boty Elections.Sarkarnama

Nagar Palika News : लोकसभा निवडणुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडली आहे. त्यामुळे भावी नगरसेवक हिरमुसले आहेत. आज निवडणूक होईल, उद्या होईल या आशेने बसलेल्या नगरसेवकांनी मतदारांना खुश करण्यासाठी वार्डावार्डात करावी लागलेली बॅनरबाजी, मेळाव्यांना, सामाजिक कार्यक्रमांना देणगी यामुळे भावी नगरसेवकांचे आर्थिक गणित बजेट कोलमडले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकांबाबत ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने भावी नगरसेवक आर्थिक दृष्टीने आता कमकुवत झाले आहेत.

फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणार या आशेने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोठ्या जोमाने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु निवडणूक प्रक्रिया जसजशी लांबत गेली तसतसे इच्छुकही हिरमुसले. आता निवडणूक कधी होईल हे कुणालाही माहीत नसल्याने इच्छुक उमेदवारही जनसेवेसाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.

Local Boty Elections.
Bhandara : प्रतिष्ठेच्या गणेशपूर ग्रामपंचायत सरपंचाला अखेर व्हावे लागले पायउतार, कारण...

पालिका पदाधिकाऱ्यांचा सेवकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपला. ही मुदत संपण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होऊन नवीन नगरसेवक निवडल्या जाणे अपेक्षित होते. परंतु आरक्षणासह इतर काही मुद्द्यांमुळे पालिकेची निवडणूक रखडली. दोन महिन्यांत होईल, चार महिन्यांत होईल, या महिन्यात होईल, असे म्हणता म्हणता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. परिणामी शहरात नागरिकांना अनेक कामांसाठी त्रास सहन करावा लागत आहे.

नगर पालिकेमधून एखादा दाखला, नोंदणी, परवाना, प्राथमिक सोयी सुविधांची कामे, कोणत्याही कामांसाठी नागरिकांना स्वतः चकरा माराव्या लागत आहेत. नगरसेवक असताना एका फोनवर नागरिकांची कामे होत होती. परंतु आता नगरसेवक नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. कुठे पथदिवे तर कुठे नळाला पाणीपुरवठा अनेक दिवस बंदच असतो. कुठे अनेक दिवसपर्यंत साफसफाई होत नाही, कुठे कचरा साचतो, काही ठिकाणी मोकाट जनावरांचा त्रास आहे. या सर्व बाबींसाठी संपर्क करायचा कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरपालिका निवडणूक लांबणीवर गेल्याने प्रशासकांची विक्रमी कारकीर्द घडली. याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होताना दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांचा निधी पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. रस्ते, नाली या व्यतिरिक्त अन्य कोणतेही विकासकामे पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लवकर व्हावी, अशी मागणी जनतेसह भावी नगरसेवकाकडून केली जात आहे. साधारणता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नगरपरिषदेची निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Local Boty Elections.
Bhandara Crime : धक्कादायक! नईम शेखच्या हत्येनंतर आरोपी गेले राजकीय नेत्याच्या घरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com