Santosh Bangar Sarkarnama
विदर्भ

Santosh Bangar : आमदार बांगर बोलतोय; ये गाडी सोडून दे...

MLA Santosh Bangar stunt audio goes viral : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला दमबाजीचा ऑडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्याभोवती वाद निर्माण झाला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि वाद, हे समीकरण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्या वादग्रस्त प्रकारांमुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विश्वासर्हतेला अनेकदा तडे गेलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वादाची अनेकदा दखल घेत समज दिली.

परंतु संतोष बांगर यांनी त्यांची दमबाजी करण्याची स्टाईल काही सोडलेली नाही. आता पुन्हा आरटीओ अधिकाऱ्याला दमबाजी करणारा ऑडिओ व्हायरल झाला आहे. हा ऑडिओ कधीचा आहे, हे समजत नसले, तरी हा ऑडिओमुळे आमदार बांगर पुन्हा चर्चेत आले आहेत.

आमदार संतोष बांगर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आरटीओ अधिकाऱ्याने एक वाहन पकडले होते, आणि त्यावर कारवाई करत होता. वाहन पकडले म्हणून, वाहनधारकाने आरटीओची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे केली. शेतकऱ्याने (Farmer) आरटीओ अधिकाऱ्याशी फोन लावून दिल्यानंतर आमदार बांगर यांनी त्यांचा दमबाजीचा दानपट्टा सुरू केला. आरटीओ अधिकाऱ्याला शिवगीळ करत गाडी सोडून द्या, असे वरच्या आवाजा म्हटले.

आरटीओच्या धंद्यामध्ये पीएच.डी

शिवसेना (Shiv Sena) आमदार संतोष बंगार बोलतोय, असे म्हणत लहान-लहान गाड्या पकडू नका. मोठ्या लाईनवरील गाड्या पकडा. आपल्याला सांगायची गरज पडली नाही पाहिजे. गोरगरिबांना लुटायचे. चांगला लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या. मलिदा तिकडून घ्यायचा, विषय क्लोज. हा धंदा आहे, तुमचा. पीएच.डी आहे, याच्यात. आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची मला आवश्यकता नाही. चांगल्या लाईनच्या गाड्या तुम्ही पकडता का? त्यांच्याकडे पर्ची तुमची. आगाऊ नाटकं करू नका. ती गाडी सोडून द्या. ती गाडी शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्याची आहे म्हणूनच त्यानी लावून दिला ना फोन. मी 26 तारखेपर्यंत बिझी आहे. 27-28 तारखेपर्यंत मला पुसदला वेळ लागणार नाही. गाड्या लावायला टाईम लागणार नाही. जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या लावेल, असा म्हणत यात अधिकाऱ्याला चांगलीच शिवीगाळ केली.

आरटीओचा दावा

व्हायरल ऑडिओमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आरटीओ आपले कर्तव्य बजावताना दिसतो. आरटीओ अधिकारी आमदार बांगर यांना ही गाडी शेतकऱ्याची नसल्याचे समजावून सांगत होता. साहेब, थेंबा थेंबा ने तळं साचतं, असे म्हणत होता. ही गाडी त्या शेतकऱ्याची नाही, हे सांगत होता. परंतु आमदार बांगर यांनी शिवीगाळ करत गाडी सोडून द्या, असे म्हटले.

आमदार बांगरांभोवती वाद...

व्हायरल ऑडिओमुळे आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत आले आहे. मध्यतंरी ते शांत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशा त्यांना सूचना आणि समज दिली होती. मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील आमदार बांगर यांनी शांततेची आणि संयमाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ते कुठल्याही वादात दिसले नाही. खानावळी चालकाला शिवीगाळ आणि त्याच्या कानशिलात लगावली होती. कृषी अधिकाऱ्याशी झालेला वाद, हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी 'एक्स'वर आमदार बांगर आणि महावितरण कर्मचाऱ्यामधील संवाद पोस्ट केला होता. विकास कामांपेक्षा अशा अनेक वादामुळे संतोष बांगर चर्चेत आहे. आता पुन्हा आरटीओ अधिकाऱ्याला दमबाजीचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT