Buldhana News, 29 August : माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांची गाडी एक पोलिस कर्मचारी धूतानाचा व्हिडिओ टाकत सरकारवर जोरदार टीका केली. तर ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील या प्रकरणाचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
या सर्व प्रकरणावर आता आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं असून पोलिस कर्मचाऱ्याने गाडी का धुतली? याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील विविध अत्याचाराच्या घटना, पोलिसांवरील हल्ले यामुळे भाजप नेते तथा राज्याचे गृहमंत्री यांच्यावर टीकेची झोड उडत आहे.
अशातच काल मालवण येथील राजकोट किल्ल्यावर झालेला राडा आणि यावेळी खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांनी पोलिसांना केलेली अरेरावी केली. तसेच विरोधी समर्थकांना थेट घरात शिरुन जीवे मारण्याची धमकी यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. महायुती सरकारने राज्यातील पोलिसांचं मनोबल कमी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच आता आणखी एका प्रकरणामुळे पोलिसांच्या मिळणाऱ्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची गाडी एक पोलिस कर्मचारी पाणी टाकून धुतानाचा फोटो अंबादास दानवे यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहिलं की, पोलिसांवर कुत्र्यासारखं धावून जाणारा नपुसंक काल बघितलाच आपण.
महाराष्ट्राचे गृहमंत्री एवढे निष्क्रिय की, आता पोलिसांना सत्ताधारी आमदारांची गाडीपण धुऊन द्यायची वेळ आली. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना महाराष्ट्र पोलिस. फडणवीसांनी पोलिसांची काय दुर्दशा करून ठेवलीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का?" असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना केला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, "आज सकाळी माझे सुरक्षा रक्षक युवराज मुळे यांनी माझ्या गाडीत आणि खिडकीतून बाहेर डोके करून उलटी केली. यावेळी माझ्या अंगावर उलटी पडली. म्हणून त्यांनी तातडीने गाडी धुवून काढली. त्यामुळे गाडी त्यांना धुवायला लावली किंवा ती साफ करायला लावली म्हणणं चुकीचं आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.