Bacchu Kadu, Ravi Rana  Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu and Ravi Rana Dispute : अमरावतीत दोन आमदारांमधील वाद मिटला ? एकमेकांचे तोंडभरुन कौतुक...

Bacchu Kadu news : लाल दिव्याची गाडी घेऊन फिरायचे नाही, मला अंपंगांचा सेवा करायची आहे,

सरकारनामा ब्यूरो

Amravati news : एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे दोघेही रविवारी एकाच मंचावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यानेमध्ये टोलेबाजी होऊन खडाजंगी होईल, असा अंदाज काहींनी व्यक्त केला होता. मात्र नेमकं उलट घडलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे तोंडभरुन कौतुक केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

नेत्रदान संकल्प दिनाच्या कार्यक्रम निमित्ताने ते एकाच व्यासपीठावर आले होते. अपंग कल्याण विभागाचे अध्यक्ष झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता. बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा मिळाल्याने आमदार रवी राणा यांच्या कडून त्यांचे कौतूक करण्यात आलं.

"हा टोले घ्यायचा कार्यक्रम नाही. लाल दिव्याची गाडी घेऊन फिरायचे नाही, मला अंपंगांचा सेवा करायची आहे, त्यासाठी मला ३६ जिल्ह्यात जायचं आहे. अपंगाची सेवा करायची आहे," असं विधान बच्चू कडू यांनी केलं.

"मला अध्यक्षपद मिळाल्याने कार्यकर्ते खूश झाले आहेत. त्यांना कळलं की याचं जमेल तर आपलंही जमेल," अशी टोलेबाजी बच्चू कडू यांनी केली.

"राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या पदरात अंपग कल्याण विभागाचे अध्यक्षपद बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिले त्यामुळे अमरावतीची जिल्ह्याच्यावतीने मी सरकारचे अभिनंदन करतो, या विभागाला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी मी विधानसभेत मागणी करेल," अशा शब्दात रवी राणा यांनी बच्चू कडूंचे कौतुक केले.

बच्‍चू कडू आणि रवी राणा यांच्‍यातील आरोप-प्रत्‍यारोप काही महिन्‍यांपुर्वी गाजले. हा वाद नंतर शमला. पण, आता अमरावती लोकसभा मतदार संघावर बच्‍चू कडू यांनी दावा सांगितल्‍याने उभय नेत्‍यांमध्‍ये पुन्‍हा एकदा संघर्ष पेटण्‍याची चिन्‍हे आहेत.

अमरावती लोकसभा मतदार संघावर प्रहार जनशक्‍ती पक्षाने लक्ष केंद्रित केले असून महायुतीत आम्‍हाला ही जागा मिळाली नाही, तर आम्‍ही स्‍वबळावर निवडणूक लढवू, असे बच्‍चू कडू यांनी सांगितले आहे. अमरावतीतून नवनीत राणा याच निवडणूक लढतील, असे रवी राणा यांनी ठामपणे सांगितले आहे. मात्र, बच्‍चू कडू यांच्‍या दाव्‍यानंतर राणा दाम्‍पत्‍याची डोकेदुखी वाढली आहे.

बच्‍चू कडू आणि रवी राणा या दोघांचाही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा आहे. दोघेही मंत्रिपदाच्‍या शर्यतीत आहेत. बच्‍चू कडू यांचा प्रहार जनशक्‍ती पक्षाचे दोन आमदार आहेत, त्‍यांना आपल्‍या पक्षाच्‍या विस्‍ताराचे वेध लागले आहेत, तर दुसरीकडे, युवा स्‍वाभिमान पक्षाचा झेंडा उंचावण्‍यासाठी रवी राणांची धडपड सुरू आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT