Bacchu Kadu Protest 
विदर्भ

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या डोक्यात 'प्लॅन बी' रेडी? कर्जमाफीची बोलणी फिस्टकली तर दिशा बदलणार?

Bacchu Kadu: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी दिलेलं निमंत्रण त्यांनी स्विकारलं आहे.

Rajesh Charpe

नागपूर: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी दिलेलं निमंत्रण त्यांनी स्विकारलं आहे. कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. उद्यापासून रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता पण मुंबईला जाण्यापूर्वी महामार्ग किंवा रेलरोको करून जनतेला त्रास होईल असे कुठलेही कृत्य करणार नाही, असे लेखी निवेदन त्यांनी उच्च न्यायालयाला दिले आहे. त्यामुळे कर्जमाफीचा बोलणी फिसकटली तर बच्चू कडू काय करणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे दोन दिवस नागपूरची वाहतूक ठप्प झाली होती. सर्वत्र अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती, शेकडो प्रवासी, गाड्या अडकून पडल्या होत्या. या नागरिकांना होत असलेल्या त्रासाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. बच्चू कडू यांना बुधवारी सायंकाळपर्यंत मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले. यावर कडू यांनी आंदोलन स्थळ सोडणार नाही, पोलिसांना बोलवून आम्हाला अटक करा, जेलमध्ये टाका असा आक्रमक पवित्रा घेतला घेतला होता. न्यायालयाने आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती, कर्जबाजारी झाल्याने लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याची दखल का घेत नाही? असा सवाल केला होता. आम्हाला न्यायालयाचा अपमान करायचा नाही. मात्र लोक न्यायालयाचाही सन्मान राखायचा असल्याचे सांगून आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता.

राज्य शासनाच्यावतीने राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी त्यांचे भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाल्यानंतर कडू यांनी मुंबईला चर्चेसाठी जाण्यास होकार दिला. मात्र, आंदोलन मागे घेणार नाही असे ठणकावून सांगितले. वाहतुकीची कोंडी होणार नाही, कोणीही गाड्या रोखणार नाही अशी हमी त्यांनी दिली. त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले, शेजारच्या मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्यास सांगितले. सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला नाही तर पुन्हा आक्रमक आंदोलन करू, रेल्वे रोखून असा इशारा त्यांनी दिला आहे.

मात्र, आज कोर्टात सादर केलेल्या निवेदनात त्यांनी रस्ते आणि रेल्वे रोखणार नाही असे म्हटले आहे. तत्पूर्वी बुधवारी दिवसभर झालेल्या राड्यावर उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, या प्रकरणावर दोन्ही पक्षांना आपली बाजू स्पष्ट करता यावी याकरता शुक्रवारी पुन्हा सुनावणी निश्चित केली आहे. पण त्यापूर्वी आज बोलणी फिस्कटली तर आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार? बच्चू कडू यांच्या डोक्यात वेगळा काही प्लॅन आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT