Bachchu Kadu Prahar Party merge Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu Prahar Party merger : महाराष्ट्रात नवं राजकीय वादळ? बच्चू कडू-एकनाथ शिंदे जवळ येतायत; ‘प्रहार’ विलीनीकरणाच्या उंबरठ्यावर!

Amravati leader Bachchu Kadu initiates statewide consultation with Prahar office bearers over possible merger with Eknath Shinde-led Shiv Sena : बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे एकनाथ शिंदे शिवसेनेत विलीनीकरणावर राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे मत मागवली आहेत.

Pradeep Pendhare

Maharashtra political merger news : राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरणाच्या वारंवार चर्चा झाल्या. अजितदादांच्या निधनानंतर या चर्चांना अधिकच जोर चढला होता. पण आता दोन्ही बाजूने या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आता एकनाथ शिंदे शिवसेना आणि बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या विलीनीकरणाचा मुद्दा पेटला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेकडून विलीनीकरणाच्या या प्रस्तावाला आता बच्चू कडू यांनी हवा दिली आहे. राज्यभरातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी म्हणणे मागवले आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण उदय होणार असल्याचे दिसते आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषद देऊ केली आहे. तशी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या तशी चर्चा झाली. पण बच्चू कडू यांच्या उमेदवारीला शिवसेनेतील नेत्यांनी विरोध केला आहे.

एकनाथ शिंदे हे बच्चू कडू यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत. यावर शिवसेना नेत्यांनी बच्चू कडू यांना, त्यांची संघटना एकनाथ शिंदे शिवसेनेत (Shivsena) विलीनीकरणाची अट ठेवली आहे. तसा प्रस्तावच समोर आणला आहे. या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा, राष्ट्रवादीनंतर या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा चर्चा राज्यात रंगली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषेदवर संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. बच्चू कडू हा विदर्भातील आक्रमक चेहरा आहे. भाजपला तो भिडू शकतो, हे हेरून, एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना जवळ केल्याचे दिसते. भाजपबरोबर राहाताना आगामी राजकारण सोपे नसणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी हेरलं आहे. यातूनच बच्चू कडू सारखा आक्रमक चेहरा आपल्याबरोबर घेण्याचा राजकीय नियोजन एकनाथ शिंदेंकडून केले जात आहे.

यातच एकनाथ शिंदे शिवसेना नेत्यांनी बच्चू कडू यांना विरोध केला असला, तरी हळूच एक प्रस्ताव पुढे करत, जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे, शिवसेना नेत्यांनी आपल्या मुख्य नेत्यासमोर स्वतःला सावरले आहे. यातून बच्चू कडू यांना विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.

राष्ट्रवादीचे नाही, पण शिवसेना अन् प्रहार....

या प्रस्तावाला देखील बच्चू कडू यांनी हवा दिल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे विलीनीकरण पाहाता आले नाही, पण राज्याला एकनाथ शिंदे शिवसेना आणि बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती पक्षाचे विलीनीकरण होताना पाहायला मिळणार, असे दिसते आहे.

बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांचे म्हणणे मागवले

या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, बच्चू कडू यांनी मोबाईल एसएमएसद्वारे राज्यभरातील प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत मागविले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत यावर चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

कार्यकर्त्यांनी नेत्यावर सोपवला निर्णय

बच्चू कडू जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे अनेक कार्यकर्त्यांचे निरोप आले आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे बच्चू कडू यांच्यावर निर्णय सोपवला आहे. त्यामुळे बच्चू कडू आमदारकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेची अट मान्य करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT