Bachchu Kadu, Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu: 'बच्चू कडू को हमने गिराया' म्हणणाऱ्या राणा दापत्याची औकातच काढली! म्हणाले, "माझ्या पराभवाचे श्रेय राणांनी घेऊ नये"

BJP Pravin Tayde wins over Bachchu Kadu in Amravati: अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील या लढतीमध्ये विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी 12 हजारहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला आहे.

Mangesh Mahale

Amravati News: विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून रिंगणात होते. तर दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक रवी राणा हे विजयी झाले आहेत. राणा दापत्यांमुळे बच्चू कडू यांचा पराभव झाला, अशी चर्चा आहे. त्यावर बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

'माझ्या पराभवाचं श्रेय राणा दापत्यानं घेऊ नये,' असा हल्लाबोल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर केला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाचे श्रेय विरोधक घेत आहे. त्यावरुन बच्चू कडू यांनी राणे दापत्यांवर निशाणा साधला आहे.

माझ्या पराभवाचे श्रेय राणांनी घेऊ नये, या निवडणुकीत महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते, अन् मी पडलो असतो, तर मी त्याचे श्रेय राणांना दिले असते. ते म्हणतात, बच्चू कडू को हमने गिराया, पण मला पाडण्याची त्यांची औकात नाही. त्यांच्यात हिमंत असेल कुठलीही निवडणूक माझ्याविरोधात अपक्ष म्हणून लढवून दाखवा, असे आव्हान बच्चू कडू यांनी त्यांना दिले.

बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांनी मोठा विजय मिळवला आहे. 60 हजाराहून जास्त मते त्यांना मिळाले आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि प्रहार जनशक्ती पक्षांच्या उमेदवारांवर मात केली आहे. राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील खराटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रिती बंड निवडणुकीच्या रिंगणात होते.

अमरावती जिल्ह्यात रवी राणा आणि बच्चू कडू हे कट्टर विरोधक आहेत. एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील या लढतीमध्ये विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी 12 हजारहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला आहे. 2004 पासून बच्चू कडू हे सलग 4 वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT