Eknath Shinde PC : मोदी, शहांना फोन, CM पदावरील दावा शिंदेंनी सोडला; फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा VIDEO पाहा

Eknath Shinde on Maharashtra CM Post: मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा पेच राज्यात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांची आज पहिलीच पत्रकार परिषद झाली.
Eknath Shinde - Devendra Fadnavis
Eknath Shinde - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: "लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ हीच माझी ओळख," असे सांगत एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमधील मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांची आज पहिलीच पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा पेच राज्यात निर्माण झाला आहे.त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते, मोदी, शाह यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केल्याचे शिंदे यांनी सांगितले. महायुतीच्या बैठकीत जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल, असे शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील विविध योजनांचा आढावा घेतला. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला.लाडक्या बहिणींनी त्यांच्या सावत्र भावांना जागा दाखवून दिली, असे सांगत शिंदेंना महाविकास आघाडीच्या पराभवाच्या वर्मावर बोट ठेवलं.

सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी बाजूला ठेवलं, असं सांगत शिंदेंनी आघाडीच्या पराभवाचे कारण सांगितलं. पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच शिंदेंनी राज्यातील जनतेचे आभार मानले. "आम्ही रडणारे नाही, तर लढणारे आहोत," अशी ठाम भूमिका शिंदेंनी मांडली.

"आम्ही नाराज होऊन रडणारे नाहीत. आम्ही लढून काम करणारे आहोत. हे सरकार लोकांमध्ये जाणारे सरकार आहे. आम्ही मनापासून काम केलं. माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी काम करेन. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सहकाऱ्यांनी राज्यात चांगले काम करता आले," असे शिंदे म्हणाले. महायुतीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कॉमन मॅन म्हणून काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी काम केले. लाडक्या बहीण, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काम करीत राहिलो. त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत झाला. सर्वसामान्य माणसाला याचा मोठा फायदा झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर पीएम नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा विश्वास दाखवला, असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com