Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu Become Aggressive : पहिले 'त्या' योजना बंद करा, बच्चू कडू कडाडले...

Amravati Prahar : ...नाहीतर प्रहारसुद्धा आंदोलनात सहभागी होणार!

Amar Ghatare

Bachchu Kadu Become Aggressive : स्वामिनाथन आयोग देशात लागू व्हावा व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाबच्या शेतकऱ्यांसमवेत देशातील अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हे आंदोलन उगाच चिघळवू नये. केंद्र सरकारने यावर निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होऊ, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना शेतकरी दिल्ली शहरांमध्ये शिरू नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी शहराच्या सीमेवर त्यांना अटकाव करण्यासाठी मोठमोठे बॅरिकेट्स लावले आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर पाण्याचा मारासुद्धा करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा आज (ता. 14) बच्चू कडू यांनी निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिघळवू नये, असे म्हणत बच्चू कडू यांनी घेत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

अनेक गोष्टींची गॅरंटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात. मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाही? शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे, ज्याप्रमाणे शासकीय नोकरदारांना सातवा, आठवा वेतन आयोग दिला जातो. तुम्ही पगाराची हमी देता मग शेतकऱ्यांना हमीभाव का देत नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला केला आहे. हे सरकार पूर्णतः फेल झाले आहे. मी जरी सरकारमध्ये सहभागी असेल, तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही चांगली योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिल्या नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हमीभाव दिला तर योजना आखायची गरज पडत नाही. त्यामुळे हमीभाव हा दिलाच पाहिजे. ती शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. गेल्या शंभर वर्षांपासून, जेव्हापासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आम्ही शेतमालाला हमीभाव मागत आहो. पण तो अद्याप दिला गेला नाही. सरकारने भिकारचोट योजना बंद करून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी रोखठोक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली.

स्वामिनाथन आयोग हा सर्व देशभरासाठी लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला 15% नफ्यानेदेखील भाव मिळत नाही, कापसाला सध्या 6000 ते 7000 भाव मिळत आहे, कापसाला राज्य शासनाच्या माहितीनुसार प्रति एकर 12 हजार रुपये खर्च येतो, मग हा खर्च 12000 असेल तर शेतकऱ्यांना नफा कुठे मिळेल? त्यामुळे शेतकऱ्यांना तोट्याने कापूस विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अशी जर अवस्था राहिली तर तुमच्या योजनेचा आणि विकासाचं आम्ही काय करायचं, असा प्रश्न बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला केला आहे. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाही, उलट त्यांचा ‘जेबकट’ होतो, सरकार शेतकऱ्यांची पाकीटमारी करत आहे, सरकार डाका टाकत आहे, सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे, अशा कठोर शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी सरकारला सुनावले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT