Bachchu Kadu News : आमदार बच्चू कडूंची स्टाईलच न्यारी..! दिव्यांगाच्या दुचाकीवरुन कार्यक्रमस्थळी आगमन...

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेतून शहरी आणि ग्रामीण, अशी विषमता निर्माण केली असल्याचा आरोप.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

- महेश माळवे

Bachchu Kadu News : पंतप्रधान आवास योजनेतून शहरी आणि ग्रामीण, अशी विषमता निर्माण केली जात आहे. शहरात अडीच लाख, तर ग्रामीणला सव्वालाख रुपये अनुदान दिले जाते. दोघांच्याही मताची किंमत सारखीच असताना लोकशाहीत अशा प्रकारचा जातीवाद, विषमता निर्माण करणार असेल तर त्या विरोधात रोखठोक भूमिका घेवू. मग आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी दिला. (Bachu Kadu spoke on Pradhan Mantri Awas Yojana)

2017 मध्ये श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलनप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या न्यायालयीन कामकाजासाठी आमदार बच्चू कडू आज श्रीरामपूर येथे आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर शेतकरी, कामगार, पशुपालक, दूध उत्पादक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Bachchu Kadu
Manoj Jarange: रायगडावरून जरांगेंची मोठी घोषणा: मराठा आरक्षणानंतर 'या' समाजासाठी आता लढा उभारणार

या कार्यक्रमस्थळी जाताना आमदार कडू यांनी दिव्यांगाच्या दुचाकीवरून जाणे पसंद केले. आमदार कडू यांची ही स्टाईल सर्वांना भावली. यावेळी अभिजीत पोटे, लक्ष्मण खडके, अप्पासाहेब ढुस, रूपेंद्र काले, नवाब शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून थेट संवाद साधण्याचे त्यांनी टाळले. मात्र, पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी आमदार कडू म्हणाले, "सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. ते फक्त बोलायचे काम आहे. काँग्रेसपासून आतापर्यंत हेच सुरू आहे. धर्माच्या, जातीच्याबाबतीत मात्र सर्वांचे वेगवेगळे आहे. धर्म हा माणसाला जगणे शिकवतो, पण पोटात अन्न असल्याशिवाय जगता येत नाही. अजून राजकीय पक्षांना हे कळालेले नाही. धर्माचे झेंडे घेऊन तुम्ही निवडणुका जिंकू शकता.

पण माणसाला जगविता येणार नाही. जगवायचे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत जात, धर्माची भांडणे थांबणार नाहीत. कांद्याची निर्यात बंदी केल्याने बांगलादेशात कांदा गेला नाही. त्याचा परिणाम संत्र्यावर झाला. बांगलादेशाने संत्र्यावर बंदी घातली. चार हजार टन संत्री बांगलादेशमध्ये जात होता, तो 400 टनही जाऊ शकला नाही.

शेतकऱ्यांच्या विरोधात एवढा मोठा निर्णय घेतला जात असताना शेतकऱ्यांमध्ये संताप दिसत नाही. जातीसाठी जसे लोक पेटतात, तसे शेतकऱ्यांवरून पेटले तरच जात, धर्माचे प्रश्न बाजूला जातील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे आमदार कडू यांनी म्हटले. राम मंदिर, मशिद, पुतळे, बुद्धविहार ही आमची बलस्थाने झाली आहेत.

ते असले पाहिजेत याबाबत दुमत नाही. पण शेतकरी, मजूर, दिव्यांग, विधवा भगिनी, घरकामगार करणाऱ्या महिला यांचे प्रश्न या सर्वांमुळे दुर्लक्षित होतात. शिक्षण क्षेत्राचंही वाटोळं झालं आहे. विखे - पाटील आणि बच्चू कडूचा पोरगा ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेत मतदान करणार्‍याचे मुलं शिकू शकेल का? असा विचार आम्ही मत मारताना केला पाहिजे.

शेतकरी पक्ष बाजूला कधी सोडणार, जातीचे, धर्माचे प्रश्न डोक्यातून कधी जाणार याचा विचार करावा लागेल. शेतमालाला काँग्रेस, भाजपनेही भाव दिले नाहीत. आम्ही तुम्हाला मत देणार नाही, असा एक फलक लावावा, असे कळकळीचे आवाहन आमदार कडू यांनी यावेळी केले. तसेच जनतेने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी भांडलो ; एकाचाही फोन नाही...

चार वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. त्या गुन्ह्याच्या तारखेला येतो. मात्र त्यातील एकाही शेतकऱ्याने आपल्याला फोन केला नाही. हेच काम जातीसाठी भांडलो असतो, धर्माचा झेंडा घेऊन बाहेर निघालो असतो, तू मराठी मी हिंदी असे म्हंटलो असतो तर चित्र वेगळे असते. या प्रश्नावर आम्हाला शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे लागेल, असे आमदार कडू यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Bachchu Kadu
Amol Kolhe News : हुजरेगिरी करणारे लोकप्रतिनिधी नको..! खासदार कोल्हेंनी नेमके कोणाला डिवचले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com