Bachchu Kadu FIR Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu FIR : भाजप आमदारच्या भावाला अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट; माजी मंत्री बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल

FIR registered against former minister Bachchu Kadu in Amravati Rural following a complaint by BJP MLA Pravin Tayade brother Abhijit Tayade : प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा माजी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात भाजप आमदाराच्या बंधूंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Amravati Rural Police case : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजीत तायडे यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत तायडे यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दिली आहे. यासंदर्भातील तांत्रिक पुरावे देखील 'पेन ड्राइव'मध्ये दिल्याने खळबळ उडाली आहे.

अभिजीत तायडे यांनी माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्याला मारण्यासाठी अपघाताचा बनाव करत कट रचल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार पोलिस ठाण्यात माजी मंत्री बच्चू कडू आणि शुभम माहुरे उर्फ गोलू या दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारदार अभिजीत दिवाकरराव तायडे (वय 40) यांनी पोलिसांत तक्रार दिली असून ते, भाजपचे (BJP) अचलपूर इथले आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू आहेत. यामुळे या प्रकाराला राजकीय वळण लागलं आहे.

माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप, अभिजीत तायडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे. या कटात शुभम माहोरे उर्फ गोलू याचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.

या दोघांमधील मोबाईलवरील संभाषणाचं रेकॉर्डिंग म्हणून अभिजीत तायडे यांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केलं आहे. हे सर्व संभाषण पेन ड्राइवमध्ये सादर केलं आहे. आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख केल्यानं प्रकरणाला गंभीर वळल लागलं आहे.

चांदूर बाजार पोलिसांनी BNS कलम 55, 58, 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अभिजीत तायडे यांनी सादर केलेले पुरावे, तपासणीसाठी न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT