Bank Fraud : अशोक खरातचा 'बँक'नामा! 400 बँक खात्यांची तपासणी होणार, 130 खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार

Ashok Kharat bank fraud case investigation: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची पोलिसांच्या तपासात बँक व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat opened 130 bank accounts fraud
Ashok Kharat opened 130 bank accounts fraudSarkarnama
Published on
Updated on

400 Accounts Under Scanner in Ashok Kharat Investigation: नाशिक मधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे मल्टी कारनामे समोर येत आहे. महिलांचे शोषणातून, राजकीय संपर्कात त्याने कोट्यवधींची माया गोळा केली. या आर्थिक व्यवहारासाठी त्याने, पतसंस्थांमध्ये एकाच दिवशी शेकडो खाती पीडितांची उघडून घेतली.

तसंच अशोक खरातशी निगडीत 400 बँक खात्यांची तपासणीची तयारी अहिल्यानगर पोलिसांनी केली आहे. या बँक खात्यांमधून काळा पैशांचा व्यवहार झाल्याची संशय असून, अहिल्यानगर पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आहे.

शिर्डी (Shirdi) पोलिस ठाण्यात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी अशोक खरात याच्या बँक व्यवहारांची माहिती खणून काढत असून, त्यात धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे.

अशोक खरात याने एकाच वेळी 130 पेक्षा जास्त बँक खाती एका पतसंस्थेत एका दिवसात उघडलीत. ही बँक (Bank) खाती वेगवेगळ्या लोकांच्या नावांनी असून, या बँक खात्यातून पैशांचा वापर काळ्या व्यवहारासाठी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व बँक खात्यांना अशोक खरात स्वतः वारसदार आहे. या बँक खात्यांना लोकांचे पॅन आणि आधारकार्ड जोडले असले तरी, सर्व खात्यांना त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडलेला आहे.

Ashok Kharat opened 130 bank accounts fraud
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

या बँक खात्यावर खोट्या स्वाक्षरी असल्याचेही समोर येत आहे. या सर्व व्यवहारात संबंधित पतसंस्थाचे कर्मचारी आणि व्यवस्थापनाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पीडित महिला, त्यांचे नातेवाईक यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली आहेत.

अशोक खरात याच्याशी निगडीत तब्बल 400 बँक खात्यांची तपासणी चालू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे अतिरीक्त अधीक्षक सोमनाथ

Ashok Kharat opened 130 bank accounts fraud
Ashok Kharat Viral Video: ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, अशोक खरात बडबड करत सुटला! मोठमोठ्या गप्पा मारणारा 'कॅप्टन' पोलिसी खाक्यासमोर गार! (Video)

अशोक खरात याचे परदेशी हवाला व्यवहार देखील समोर येत आहे. याशिवाय त्याच्या मुलाकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत दररोज मोठ्याप्रमाणात घरी कॅश यायची. ही कॅश पुढे कशी अन् कशा मार्फत फिरायची, याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहेत.

अशोक खरात याच्याकडील दररोजच्या येणाऱ्या कॅश डिलव्हरमागे काही राजकीय संबंध असू शकतात, असा पोलिसांना संशय आहे. यातूनच 400 बँक खाती तपासाबाबत पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com