Rahuri Bypoll : राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना मैदानात, कट्टर कार्यकर्त्यानं नेला उमेदवारी अर्ज; महायुतीमधील भाजपची डोकेदुखी वाढली

Shiv Sena Eknath Shinde faction filing nomination for Rahuri bypoll sparks tension within ruling Mahayuti, BJP sees it as a setback : राहुरी पोटनिडवणुकीसासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेने उमेदवारी अर्ज नेल्याने महायुतीमधील भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Shiv Sena Eknath Shinde
Shiv Sena Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Rahuri Bypoll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं चित्र नऊ एप्रिलला स्पष्ट होईल. तत्पूर्वी मात्र अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राहुरी पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते रामचंद्र शेटे यांच्या पत्नी सविता रामचंद्र शेटे (शिवसेना - एकनाथ शिंदे गट, रा. पिंप्री वळण) आणि शिवसेनेचे शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रविंद्र बापुसाहेब मोरे यांनी अर्ज नेल्यानं, महायुतीत खळबळ उडाली आहे.

सत्ताधारी महायुतीत भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवार निश्चित झाली आहे. असे असताना एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नावावर सविता रामचंद्र शेटे यांनी अर्ज नेल्याने महायुतीत या निवडणुकीवरून 'नाॅट इज वेल' आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

राहुरी (Rahuri) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत एकूण 49 जणांसाठी 103 उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. यात मतदारसंघाबाहेरील, जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील उमेदवारी अर्ज नेल्याने पोटनिवडणुकीविषयी उत्सुकता वाढली आहे.

या मतदारसंघात पारंपारिक पद्धतीने कर्डिलेविरूद्ध तनपुरे, असा सामना रंगतो. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आता नवखे अक्षय कर्डिले आणि अनुभवी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहेत. भाजपने इथं कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी निश्चित केली आहे. अक्षय कर्डिलेंनी मतदारसंघ पिंजून काढत असताना, इकडे सत्ताधारी महायुतीमधील मित्र पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेने उमेदवारी अर्ज नेल्याचं समोर आलं आहे. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. यामुळे उमेदवारीबाबत संभ्रम आहे.

Shiv Sena Eknath Shinde
Rahuri Bypoll : हिंदुत्वाच्या लाटेवर प्राजक्त तनपुरे! शशिकांत शिंदेंनी दिली मोठी अपडेट, पवारसाहेब अंतिम निर्णय घेणार

राहुरी इथल्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रामचंद्र शेटे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून ताकद लावली होती. ही निवडणूक राज्य पातळीवर गाजली. आता पोट निवडणुकीसाठी रामचंद्र शेटे यांच्या पत्नी सविता आणि शिवसेनेचे शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रविंद्र बापुसाहेब मोरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नावानं अर्ज नेला आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्षांनीच, विशेष करून एकनाथ शिंदे शिवसेनेनं भाजपच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

Shiv Sena Eknath Shinde
Sujay Vikhe : सुजय विखे म्हणतात, "स्पर्धेत नाही, पण सर्व्हे केल्यास माझंच नाव पुढे दिसेल" : राहुरी पोटनिवडणुकीत सर्व्हे पॅटर्ननं वाढवली रंगत

कर्डिलेंचा कट्टर प्रतिस्पर्धीचा उमेदवारी अर्ज दाखल

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनं पत्नीच्या नावानं अर्ज नेल्याच समोर येताच, कर्डिलेंचे कट्टर प्रतिस्पर्धी जेऊरमधील पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी अर्ज नेत, तो भरला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मध्यंतरी त्यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाई चांगलीच गाजली होती.

तनपुरेंचा पक्ष कोणता असणार याची उत्सुकता

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारीच्या रिंगणात आहे अजून स्पष्ट झालं नसलं, तरी ते हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारसंघात आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत. भाजपच्या हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या मुद्यासमोर, तनपुरे यांचा हिंदुत्वाचा कितपत प्रभावी ठरतो, याकडे आता लक्ष लागंल आहे.

मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यात आता काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे. महायुती इथं पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणती, भूमिका घेतात, अक्षय कर्डिले मतदारसंघासाठी कोणता जाहीरनामा देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com