Bachchu kadu News Sarkarnama
विदर्भ

Bachchu kadu News : बच्चू कडूंचा महायुतीला दणका; आघाडीच्या उमेदवाराला देणार राजकीय बळ?

Lok Sabha Election 2024 News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बच्चू कडूंचे जाहीर आभार मानल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Chetan Zadpe

Vidarbha News : प्रहार क्रांती संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्यामहायुतीचे घटक पक्ष आहे. असे असले तरी त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडूंनी आपल्या प्रहार संघटनेकडून उमेदवार उभा केला आहे. तसेच अकोला मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना कडू पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बच्चू कडूंचे जाहीर आभार मानल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेसचे (Congress) उमेदवार अभयसिंह पाटील यांना बच्चू कडू उद्या आपला जाहीर पाठिंबा देणार आहे, अशी चर्चा आहे. बच्चू कडूंच्या या निर्णयाचं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्वागत केले आहे. बच्चू कडू यांच्या संभाव्य निर्णयामुळे अकोल्यातून महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाल्याचे आमदार देशमुखांचं म्हणणं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बच्चू कडू यांनी कार्यकत्यांचं सन्मान राखत हा पाठिंबाचं निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे आमरावती आणि रामटेकनंतर बच्चू कडू महायुतीला जोरदार दणका देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीच आता मित्रपक्ष नाराज आहेत का? अमरावतीची (Amravati) जागा बच्चू कडू यांना न दिल्याने कडूंनी अशा प्रकारची भूमिका घेतली का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

बच्चू कडू यांची निर्णायक राजकीय ताकद -

बच्चू कडू (Bachchu kadu) हे सलग तीन वेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सरकारात ते मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री होते. अकोट विधानसभा मतदारसंघात प्रहारला 25 हजार मते होती. मुर्तिजापूर विधानसभेत प्रहारला दहा हजार मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT