Amit Shah, Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : शरद पवार सरदार तर अजित पवार कोण? बच्चू कडूंचा थेट अमित शहांना सवाल

Sunil Balasaheb Dhumal

Amravati Political News : पुण्यातील भाजप अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बराच वेळ ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका करण्यात घालवला. शरद पवारांनी भ्रष्टाचारा संस्थात्मक स्वरूप दिले. ते भ्रष्टाचारींचे सरदार आहेत, अशा शब्दात शहांनी पवारांवर हल्लाबोल केला.

त्यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट अमित शहांनाच सवाल केला आहे. पवार सरदार आहेत, मग अजित पवार कोण, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra modi भ्रष्टाचाराचा आरोप करून तुरुंगाची भाषा केल्यानंतर अजित पवार भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यापूर्वीही भाजपचे राज्यातील सर्व नेते उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. हाच धागा पकडून कडू यांनी शहा यांना पवारांवरील टीकेनंतर सडेतोड प्रश्न केले आहेत.

बच्चू कडू म्हणाले, अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने निघाले असतील ते विसरभोळे आहे. बऱ्याचदा अमित शहा चुकीचे बोलतात मग नंतर त्यांच्या अंगलट येते. शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहे? शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत. आणि अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये, असेही कडूंनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटले आणि भाजपला फटका बसला. राज्यात आता विधानसभेचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले. त्यात केंद्रीय मंत्री शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर Sharad Pawar जोरदार टीका करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

अमित शाह नेमके काय म्हणाले?

राज्यात भाजपचे सरकार असते त्यावेळी मराठा आरक्षण दिले जाते. तर पवारांचे सरकार आल्यानंतर ते गायब होते. आताही आरक्षणासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र पुढे पवारांचे सरकार आल्यानंतर त्याची चर्चाही होणार नाही. पवारांनी खोटे बोलून लोकांची मते घेतली.

आता त्यांचा घरोघरी जाऊन पर्दाफाश करायचा आहे. असे पवार आता भ्रष्टाचाराबाबत प्रश्न करतात. मात्र देशातील भ्रष्टाचारींचे सरदारच पवार आहेत. त्यांनी भ्रष्टाचारा संस्थात्मक दर्जा दिल्याचा गंभीर आरोपही शाह यांनी केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT