Ravikant Tupkar : हकालपट्टी होताच रविकांत तुपकरांचा मोठा निर्णय;राज्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बोलाविली बैठक!

Ravikant Tupkar Vs Raju Shetti : शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी 24 जुलैला पुण्यात राज्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. नवी पेठेतील एस. एस. जोशी सभागृहात ही बैठक होणार असून यामध्ये शेतकरी चळवळीची पुढील आंदोलनात्मक तसेच राजकीय दिशा ठरविली जाणार आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांच्याविरोधात निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती.या समितीच्या सदस्यांनी घेतलेला निर्णय सोमवारी जाहीर करत तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी केली आहे.

त्यामुळे आता तुपकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात आपले वेगळे वलय आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण करणाऱ्या तुपकर यांनी बुधवारी 24 जुलैला महत्वाची बैठक बोलाविली आहे.

या बैठकीत राज्यभरातील चळवळीतील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.येणारी विधानसभा निवडणूक पाहता ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण समजली जात असून या बैठकीत चळवळीची पुढील दिशा व राजकीय भूमिका यावर विचारमंथन होणार आहे. तर या बैठकीत नवी राजकीय घोषणा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

रविकांत तुपकर हे नाव संपूर्ण राज्याला परिचित आहे.शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांची ओळख आहे.राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केलेली आहे.चळवळीतील नव्या जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना त्यांनी आता एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Ravikant Tupkar
Maharashtra BJP : भाजप चक्रव्यूहात; 'धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतयं!' अशी अवस्था

याच अनुषंगाने शेतकरी चळवळीतील पुढील आंदोलनात्मक व राजकीय दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी (Farmer) चळवळीतील प्रमुख महत्वाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक 24 जुलैला पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. नवी पेठेतील एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह, येथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे.

या बैठकीत सर्वांसोबत विचार मंथन व चर्चा करून शेतकरी चळवळीची पुढील आंदोलनात्मक तसेच राजकीय दिशा ठरविली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी अपक्ष तब्बल अडीच लाख मते घेत संपूर्ण राज्यातील सगळ्याच प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नुकतीच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी होणार? समिती आज निर्णय जाहीर करणार

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली होती.संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढवायची,असा निर्धार करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता.त्यानंतर आता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पुणे येथे राज्यस्तरीय बैठक होऊ घातली आहे.

राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत आता नेमकी आंदोलनाची घोषणा करतात की विधानसभेच्या दृष्टिकोनातून राज्यपातळीवर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते देखील या बैठकीकडे लक्ष ठेवून बसले आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com