Balu Dhanorkar, Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar
Balu Dhanorkar, Vijay Wadettiwar, Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Bazar Samiti Results : धानोरकरांच्या पराभवासाठी वडेट्टीवार अन्‌ मुनंगटीवार एकत्र : काँग्रेस आमदारानेच केला खासदाराचा पराभव

सरकारनामा ब्यूरो

Chandrapurat Market Committee Election : चंद्रपूर बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 18 पैकी 12 जागांवर भाजप आणि काँग्रेस समर्थित शेतकरी सहकार परिवर्तन पॅनलला विजय मिळाला आहे.

तर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे समर्थित शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे. तर पालकमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीचा विजय झाला आहे. स्थापनेपासून काँग्रेसकडे असलेली चंद्रपूर बाजार समिती आता काँग्रेस आणि भाजपच्या (BJP) ताब्यात असले.

या निवडणुकीत अनोखे राजकारण रंगले होते. बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचा (Congress) वेगळा पॅनल केला होता. तर भाजपच्या मतदीने विजय वडेट्टीवार यांनी दुसरा पॅनल केला होता. त्यामुळे मुख्य लढत ही काँग्रेसमध्येच झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसनेच काँग्रेसचा पराभव केला अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. आज त्या अनेक बाजार समित्यांची निवडणूक निकाल जाहीर होत आहे. त्यामध्ये आता पर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे नागपूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. कारण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे पटोलेंना लोकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वातील भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलला मोठा विजय मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT