Saurabh Katiyar Sarkarnama
विदर्भ

Amravati District Collector : महसूल खात्यात खळबळ; IAS कटियारांना वेगळाच संशय, एकाच वेळी 14 तहसीलदारांना नोटीस बजावल्या

Amravati District Collector Saurabh Katiyar notice Tehsildars Bangladeshi fake birth certificate case : बांगलादेशींना बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणावरून अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Bangladeshi Fake Birth Certificate : अमरावती जिल्ह्यातील घुसखोर बांगलादेशींना दिलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रावरून महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या याप्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.

पूर्वी यात आठ जणांविरोधात आणि रविवारी (ता. 16) तीन जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. प्रमाणपत्र वाटपाची व्याप्ती मोठी असून, आठ हजार जणांना जन्म-मृत्यूचे अवैध प्रमाणपत्र असल्याचा दावा, किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यात बांगलादेशींना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वाटपाची व्याप्ती मोठी आहे. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. त्यावरून अमरावतीमधील महसूल प्रशासनाच्या कारभारातील गोंधळ आणखी चव्हाट्यावर आला आहे.

15 हजार जन्म-मृत्यू दाखल्यापैकी 9 हजार दाखले बनावट कागदपत्राच्या आधारे दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील प्रशासनाच्या कारभारावर प्रशचिन्हं उपस्थित केले जात आहे. यावरून अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार 'अ‍ॅक्शन मोड'वर आले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावत त्यावर 24 तासात तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याकडून स्पष्टीकरण मािगतले आहे.

काही नायब तहसीलदारांनी परस्पर जन्म-मृत्यूचे दाखले दिल्याचा आरोप आहे. भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी चार महिन्यात पाच वेळा अमरावतीत दौरा केला होता. बनावट कागदपत्राचे आधारे जन्म-मृत्यू दाखले दिल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. अमरावती जिल्ह्यात याप्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाधिकारी कटियार यांनी त्याची गंभीर दखल घेत सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT