Ahilyanagar ZP CEO : ठरविकांचे फोन उचलणाऱ्या 'IAS'शी खासदार लंकेंचा पंगा; थेट मुख्य सचिवांकडे तक्रार

MP Nilesh Lanke Ahilyanagar Zilla Parishad CEO IAS Ashish Yerekar Maharashtra Chief Secretary : खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सीईओ IAS आशिष येरेकर यांची राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार केली.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कारभाराची खासदार नीलेश लंके यांनी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे तक्रार केली आहे.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्याविरोधात मध्यंतरी रान पेटवून IPS राकेश ओला यांच्या अधिपत्याखाली असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभाराविरोधात बेमुदत उपोषण करणाऱ्या खासदार लंकेंनी आता IAS आशिष येरेकर यांच्याशी पंगा घेतला आहे. ठराविक लोकांचे फोन उचलणे, कार्यालयातील अनुपस्थितीवर खासदार लंकेंनी तक्रारीत बोट ठेवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे IAS आशिष येरेकर यांच्या कारभाराविषयी तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनातील फेब्रुवारी महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीईओ येरेकर 24 फेब्रुवारीला दोन मिनिटे व 25 फेब्रुवारीला 32 मिनिटे दालनात उपस्थित असल्याचे दिसत असल्याचे तक्रारी म्हटले आहे.

Nilesh Lanke
Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांचे 'नेक्स्ट टार्गेट' ठरलं; आता अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई!

आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर वितरीत परिणाम झाला आहे. येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीतमुळे अनेक सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत. यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. येरेकरांच्या अनुपस्थितीमुळे महत्वाचे निर्णय घेताना विलंब होत असून त्याचा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे खासदार लंकेंनी (Nilesh Lanke) पत्रात म्हटले आहे.

Nilesh Lanke
BJP Minister Jaykumar Gore : अश्लील फोटो प्रकरण, मंत्री गोरेंच्या खंडणीच्या गुन्ह्यात मोठी अपडेट; उपमुख्यमंत्री शिंदेंचा 'सुभेदार' अटकेत

कारवाईची मागणी

जिल्हा परिषदेच्या कामकाजात नियमितता आणण्यासाठी त्वरीत उपाययोजना केल्या जाव्यात. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

खासदार लंकेंनी सीसीटीव्ही फुटेज पाठवले

अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या दालनातील फेब्रुवारी महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचा दाखला, खासदार लंकेंनी दिला. आशिष येरेकर 24 फेब्रुवारीला दोन मिनिटे आणि 25 फेब्रुवारीला 32 मिनिटे दालनात उपस्थित असल्याचे दिसत आहे. इतर दिवशी ते पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान येरेकरांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज खासदार लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com