Shivsena Congress Alliance Sarkarnama
विदर्भ

Bhandara Bazar Samiti: भंडाऱ्यात शिवसेनेचा थेट काँग्रेसशी घरोबा, महायुतीत फूट; साताऱ्यानंतर 24 तासांतच भाजपला दुसरा 440 व्होल्टचा झटका

Bhandara Krushi Bazar committee: महायुतीत सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. याचाच प्रत्यय सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वचपा काढत शिवसेना शिंदे गटानं भाजपला जोरदार झटका दिला आहे.

Deepak Kulkarni

Bhandara News: महायुतीत सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. याचाच प्रत्यय सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वचपा काढत शिवसेना शिंदे गटानं भाजपला जोरदार झटका दिला आहे. सातारा जिल्हा बँकेत भाजपचे सर्वाधिक 9 संचालक असताना देखील या बँकेत महायुतीतील भाजपला दूर ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादीनं अध्यक्ष,उपाध्यक्ष पद पदरात पाडून घेतलं आहे. आता पुन्हा एकदा शिवसेना व राष्ट्रवादीनं भाजपला झटका देत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचं समोर येत आहे.

सातारा जिल्हा बँकेनंतर आता भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधून गुरुवारी (ता.19 नोव्हेंबर) महायुतीसह राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी बातमी समोर येत आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चक्क महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोधी बाकावरील काँग्रेससोबत हातमिळवणी करत मित्रपक्ष भाजपाविरोधात पुन्हा एकदा उठाव केला आहे.

भंडाऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं सत्तेत असलेल्या भाजपवर अडीच वर्षांपूर्वी दिलेला लेखी आश्वासन न पाळल्यानं थेट काँग्रेससोबतच हातमिळवणी केली. भंडारा कृषी उत्पन्न समितीत एकूण 18 सदस्य संख्या आहे.

या बाजार समितीत आज पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे 3 सदस्य अनुपस्थित राहिल्यानं 15-0 अशा एकतर्फी मतांनी शिवसेनेच्या आशू वंजारी यांनी सभापती पदाच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे आता भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेची सत्ता आली असून,भाजपवर सत्ता गमवावी लागली आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक उदयसिंह पाटील निंबाळकर तर,व्हाईस चेअरमनपदावर शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांची निवड झाली. या निवडणुकीत शिवसेनेनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळचा वचपा आता सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांनी "खोलवर असलेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत, त्यासाठी जालीम औषध घ्यावे लागते" असं सूचक वक्तव्य करत भाजपला डिवचलं होतं. या त्यांच्या विधानाची आणि महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रियांची चर्चा सुरू आहे. बँकेच्या कामकाजात राजकारण न आणता शेतकरी व सभासदांच्या हितासाठी काम करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT