Eknath Shinde News: मोठी बातमी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा बिघाड, पंढरपूरमध्येच घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Pandharpur News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे गुरुवारी (ता.19 नोव्हेंबर) कार्तिकी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी हेलिपॅडवर दाखल झाले असतानाच ही घटना घडली. हेलिकॉप्टरमध्ये जरी तांत्रिक बिघाड झाला असला तरी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pandharpur News: राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ते गुरुवारी(ता.19) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. मात्र,ऐनवेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं प्रशासनाची धावपळ झाली. एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तिसर्यांदा बिघाड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे गुरुवारी (ता.19 नोव्हेंबर) कार्तिकी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी हेलिपॅडवर दाखल झाले असतानाच ही घटना घडली. हेलिकॉप्टरमध्ये जरी तांत्रिक बिघाड झाला असला तरी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पंढरपूर येथे हेलिकॉप्टरच्या बॅटरीचा अचानक प्रॉब्लेम झाल्यानं एकनाथ शिंदे यांना बराच वेळ हेलिपॅडवर थांबावं लागलं होतं. मात्र, तरीही ते सुरु होऊ शकलं नाही. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक अधिकाऱ्यांनाही हेलिपॅड परिसरात उपस्थित राहावं लागलं.

या घटनेत कोणीही जखमी झालेले नसून शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे ते पंढरपूरहून रस्तेमार्गे पुण्याला रवाना झाले असून, तेथून विमानाने मुंबईला निघाले असल्याचं समोर येत आहे.

Eknath Shinde
Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा काँग्रेस, अभिजीत दिपके यांना मोठा दणका, रामलीला मैदान, कनॉट प्लेस परिसरातील आंदोलन भोवलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही एकूण तिसरी वेळ आहे. यापूर्वी सप्टेंबर 2026 मध्ये गुजरात दौऱ्यावर असतानाही वडनगर येथून अहमदाबादकडे रवाना होताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागला होता.

तसेच 7 मे 2026 रोजी मुंबईहून मुरबाडकडे जाताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर मुंबईत परत फिरवावं लागलं होतं. यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना 13 मे 2023 रोजी तांत्रिक बिघाडामुळे एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे मुंबईतील राजभवन (लोकभवन) हेलिपॅडवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तसेच जानेवारी 2023 मध्येही मुंबई विमानतळावर त्यांच्या शासकीय विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता.

Eknath Shinde
BJP MLA News : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; भाजप आमदाराला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमके प्रकरण..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.