Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

NCP News : खामगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार; माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार

Khmgav Congress News : खामगाव बाजार समितीचे काँग्रेसचे सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह चार संचालकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Rajesh Charpe

Khamgaon News : काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. बाजार समितीचे सभापती व त्यांच्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी सानंदासुद्धा उपस्थित होते. हे बघता काँग्रेसला खामगावात मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खामगाव बाजार समितीचे काँग्रेसचे (Congress) सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह चार संचालकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिलीपकुमार सानंदा काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा विधानसभा निवडणुक झाल्यापासून सातत्याने होत आहेत. मागील काळात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही भाजप नेत्यांच्या देखील भेटी घेतल्या होत्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेसची विचारधारा जुळती असल्यामुळे तसेच खामगाव मतदारसंघातील त्यांचे पुढील राजकीय गणित पाहता सानंदा हे राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पक्षप्रवेशही निश्चित झाला होता. मात्र काही कारणास्तव हा पक्षप्रवेश टळला. त्यांनतर सानंदा यांनी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेत पक्षप्रवेशाचे संकेत दिले होते.

खामगाव बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक गणेश ताठे, विलाससिंह इंगळे, श्रीकृष्ण टिकार आणि सचिन वानखेडे आदी पदाधिकाऱ्यांनी दिलीपकुमार सानंदा यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा एक प्रकारे सानंदांचा प्रवेश झाला असल्याचे मानले जाते. सानंदा यांनी प्रवेश केला नसला तरी त्यांची उपस्थितीत त्यांच्या अघोषित प्रवेशावर शिकामोर्तब होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात मोठा कार्यक्रम घेऊन हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT