Ujwal Nikam Sarkarnama
विदर्भ

Shivsena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधी उज्ज्वल निकमांचं मोठं विधान; म्हणाले ‘ज्यांच्या हाती सत्ता...’

जयेश विनायकराव गावंडे

Maharashtra Political News : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल बुधवारी (ता. १० जानेवारी) विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा नार्वेकर यांच्याकडे लागल्या आहेत. त्या निकालासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. उद्या काही राजकीय भूकंप होणार नाही. कारण, ज्यांच्या हाती सत्ता असते, ते कधी सहजासहजी सत्ता सोडत नसतात; म्हणून कायद्याचे काय खेळ खेळले जातात, ते पाहूया. मात्र, उद्याचा निकाल हा राज्यासाठीच नव्हे; तर संपूर्ण देशासाठी मैलाचा दगड ठरेल, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. (Big statement by Ujwal Nikam before the verdict of Shiv Sena MLA disqualification case)

अकोला येथे आज उज्ज्वल निकम यांच्याशी ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षात उभी फूट पडते. या पक्षातील दोन्ही दावेदार गट हे आपलाच पक्ष म्हणून दावा करतात. त्यावेळी खरा पक्ष कोणता आणि दहाव्या परिशिष्टनुसार अपात्रता आहे का, हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. जर शिवसेना हा शिंदे गटाचा पक्ष आहे. असं जरी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने विधिमंडळात हा पक्ष कुणाच्या बाजूने हा निर्णय देण्यास सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. एक म्हणजे ठाकरे गटाचा व्हीप ज्याची निवड ही वैध ठरवलेली आहे, तर दुसरा म्हणजे शिंदे गटाचा व्हीप याचा अवैध. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, ज्या नोटिशीद्वरे १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती, त्या नोटिशीतील मजकूर हा महत्त्वाचा आहे. कारण आमदारांची अपात्रता ही १० व्या परिशिष्टानुसार विशिष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते. तशी परिस्थिती या नोटिशीमध्ये आहे का, याबाबतीचा निर्णय स्पीकर यांना घ्यावा लागेल, असं निकम यांनी म्हटलं आहे.

आज आपल्याला राजकीय वातावरण हे अस्थिर वाटत असेल तरी उद्या ते तसं नसेल, कारण अध्यक्ष हे संपूर्ण प्रकारावर निर्णय देतील का, प्राथमिक मुद्द्यावर निर्णय देतील, हे पाहावं लागेलं. पण निकालावर भाष्य करणं, उज्ज्वल निकम यांनी टाळलं. मात्र, शिंदे गटाला बजावण्यात आलेल्या नोटिशीमधील मजकूर हाच कळीचा मुद्दा असेल आणि त्यावरच अध्यक्ष निर्णय देतील, असंही निकम म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचे विधानसभा सदस्यत्व अपात्र ठरलं तर सरकार पडेल का, यावरही निकम यांनी बोलणं टाळलं. मी जर-तरच्या मुद्द्यावर बोलत नाही. ज्याची हाती सत्ता असते, ते सहजासहजी सत्ता सोडायला तयार नसतात, असंही निकम यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT