Sandipan Bhumre : निकाल आमच्या बाजूनेच, ठाकरे गटातील आमदारही आमच्याकडेच येतील...

MLA Disqualification Case : निकाल विरोधात गेला तरी संघटनेत काम करीत राहू...
Sandipan Bhumre
Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena: देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील शिंदे व शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. या निकालावरून शिंदे व ठाकरे गटाचे नेते दावे, आरोप-प्रत्यारोपही करीत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-नार्वेकर भेटीवर टीक करीत थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचे जाहीर केले, तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री तथा छत्रपती संभीजानगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मात्र उद्याचा (बुधवारी) निकाल हा आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला आहे. आमची बाजू भक्कम असून उद्या विधासभाध्यक्ष जो निकाल देतील तो आमच्याच बाजूने लागेल, असा आम्हाला विश्वास आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे उद्या निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाकडे असलेले आमदारही आमच्याकडे येतील, असा दावाही भुमरे यांनी केला. जर निकाल आमच्याविरोधात गेला तर तो आम्ही मान्य करू, पण ठाकरे गटाच्याविरोधात गेला तर त्यांच्याकडे एकही आमदार शिल्लक राहणार नाही, तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत म्हणजे बाळासाहेबांच्या पक्षात येतील.

शंभर टक्के उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल आणि जर विरोधात गेला तरी संघटनेत काम करीत राहू, असेही भुमरे यांनी स्पष्ट केले. तिकडे ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचेही या निकालाकडे लक्ष लागले आहे. उद्याच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती आहे. आमदार अपात्र प्रकरणावर उद्या (ता. 10) विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात? याची उत्सुकता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

दरम्यान, उद्या शिवसेना शिंदे गटाच्या ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे, त्यात मराठवाड्यातील सर्वाधिक सहाजणांचा समावेश आहे. त्यापैकीच एक संदीपान भुमरेही आहेत. याशिवाय अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, प्रा. रमेश बोरनारे, संजय शिरसाट यांचेही भवितव्य उद्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.

R...

Sandipan Bhumre
Nagar Lok Sabha : दोघांत तिसरा; नगर दक्षिण लोकसभेसाठी तनपुरे, ढाकणेंसह 'हा' चेहरा चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com