BJP's Agitation in Bhandara Sarkarnama
विदर्भ

BJP Agitation News : कॉंग्रेसने जाळला होता मोदींचा पुतळा, बदल्यात भाजपने केले ‘जोडे मारो’ आंदोलन !

Vidarbha Political News : नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

अभिजीत घोरमारे

Bhandara Political News : महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकार मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री नाही, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २०) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली. हा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी माफी मागावी, यासाठी भाजपने काल (ता. २१) जोडे मारो आंदोलन केले. (Protest was expressed by burning effigy of Narendra Modi)

दरम्यान भाजपकडून राहुल गांधी यांना रावणाची उपमा दिल्यानंतर कॉंग्रेस पेटून उठली होती. भंडारा शहरात त्रिमूर्ती चौकात सहा ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्याचा बदला म्हणून भाजपने केलेले जोडे मारो आंदोलन केले. हे भाजपचे कॉंग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन युवकांना बेरोजगार करण्याचा घाट घातला होता. आपल्या जवळच्या लोकांच्या संस्थांना कंत्राटी कामगारांचे ठेके देऊन तरुणांची स्वप्ने भंग केली होती, असा उलट आरोप भंडारा भाजपचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी कालच्या आंदोलनात केला.

दरम्यान आज ‘सरकारनामा’शी बोलताना प्रकाश बाळबुद्धे म्हणाले की, कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय हा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेला आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याचा पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या भरतीचा जीआर काढून त्याचे काम नऊ कंपन्यांना दिले होते, असा प्रत्यारोप बाळबुद्धे यांनी केला.

दुटप्पी भूमिका

कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगारांची दिशाभूल करण्याचे महापाप केले. स्वतःचे सरकार असताना निर्णय घ्यायचा आणि ते गेल्यानंतर स्वतःच आरोप करायचे, अशी दुटप्पी भूमिका महाविकास आघाडी घेत आहे. महायुती सरकारला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असेही बाळबुद्धे म्हणाले.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा तो डाव उधळून लावला आहे. त्यामुळे तरुणांच्या शासकीय नोकरीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. महाविकासचे हे कंत्राटी नोकर भरतीचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी धुऊन काढल्याचेही बाळबुद्धे म्हणाले.

कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्याबाबत अपशब्द काढल्याचा राग मनात ठेवून भाजप नेत्यांचे पुतळे जाळले होते. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर भाजपसुद्धा आंदोलनानेच त्याचे प्रत्युत्तर देईल, असे मानले जात होते. त्यानुसार भाजपने काल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारत आंदोलन केले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT