BJP Flag Sarkarnama
विदर्भ

BJP Politics Nagpur : संविधानाची पायमल्ली कोणी केली? ; भाजप नागपूरात घरोघरी पत्रक वाटणार अन्..

BJP launches leaflet drive in Nagpur to question who violated the Constitution : याशिवाय नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदार संघातील २० मंडळात १० जनसंवाद सभा, त्यानंतर २० मोठ्या सभा घेण्यात येणार आहे

Rajesh Charpe

BJP’s Strategy in Maharashtra Politics : मोदी सरकार ‘ग्याराह साल बेमिसाल' कार्यक्रम घेऊन भाजपने आता महापालिका आणि स्थाननिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारी सुरू केली आहे. या सर्व प्रचार प्रसारात भाजपने संविधानाच्या मुद्यावर विशेष भर दिला असल्याचे दिसून येते. येत्या २५ जूनला आणीबाणीचे सर्वांना स्मरण करून देतानाचा संविधानाची पायमल्ली कोणी केली याची पत्रके घरोघरी वाटप केले जाणार आहे. संविधानाची पुस्तके हाती घेऊन मिरवणाऱ्यांनीच संविधानाचा सत्यानाश कसा केला, हे लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहे. असं भाजपकडून सांगितलं गेलं आहे.

मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात केलेल्या सुधारणा, या दरम्यान झालेला देशाचा विकास, शक्तीशाली देश म्हणून मिळालेली ओळख आणि गोरगरिबांना दिलेल्या सुविधांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी १२ जून ते २५ जून अशी भरगच्च कार्यक्रमांची आखणी भाजपने केली आहे.

या दरम्यान नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदार संघातील २० मंडळात १० जनसंवाद सभा, त्यानंतर २० मोठ्या सभा घेण्यात येणार आहे. या सभांमधून केंद्र, राज्य आणि महापालिकेने लोकांच्या सुविधेसाठी काय काय निर्णय घेतले, त्याचे काय फायदे झाले हे सांगण्यात येणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी चार्टर अकाऊंटंट, फायनान्स क्षेत्रातील कन्सटंट यांचे संमेलन, शिक्षकांचे संमेलन, नवयुवक व्यवसायींचे संमेलन घेण्यात येणार आहे.

तसेच केंद्र व राज्य सरकारच्या समाज कल्याणा संदर्भातील सर्व योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी २० मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामामार्फत सेतून केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा आता महापालिकेच्या झोन स्तरावर देण्यात येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

हे सर्व करीत असताना भाजपने संविधानाच्या कार्यक्रमावर विशेष भर दिला असल्याचे दिसून येते. आणीबाणीचा विरोध करताना मिसाबंदी कायद्याखाली अटक झालेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. आणीबाणीमुळे उध्वस्त झालेली कुटुंब, त्यावेळी देशात निर्माण झालेली अस्थिरता आणि नुकसान याची माहिती देण्यासाठी एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

यासोबतच संविधानाची पायमल्ली कोणी याची माहिती देणारी पत्रके वाटून संविधानाचे मारेकरी कोण? हा संदेश घरोघरी पोहचविला जाणार आहे. हातात संविधानाचे पुस्तके घेऊन फिरणाऱ्यांनीच कसा संविधनाचा सत्यानाश केला हे पटवून देण्याचा प्रयत्न भाजपच्यावतीने केला जाणार आहे. असंही त्यांनी सांगितलं. यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे, अनिल सोले, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, माजी खासदार अजेय संचेती, शहर महिला अध्यक्ष प्रगती पाटील, चेतना टांक, अश्विनी जिचकार, संदीप जाधव, संदीप गवई आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT