Vidharbha Politic's : प्रफुल पटेलांनी आणलेल्या प्रकल्पासाठी घेतलेली 500 एकर जमीन आमदार फुकेंनी शेतकऱ्यांना परत मिळवून दिली

MLA Parinay Phuke News : भेल कंपनीने सुमारे बारा वर्षांपूर्वी (2012) भंडारा जिल्ह्यात प्रकल्प उभा करण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पातून मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचेही आश्वासन दिले होते. याकरिता 500 एकर जमीन घेतली होती.
MLA Parinay Phuke
MLA Parinay PhukeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 10 June : प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराचे आमिष देऊन शेतकऱ्यांच्या जागा बळाकावून ठेवणाऱ्या भेल कंपनीला आमदार परिणय फुके यांनी धडा शिकवला आहे. त्यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना घेऊन सुमारे पाचशे एकर जागा शेतीसाठी मोकळी करून दिली. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी भारत हेवी ईलेक्टिकल्स लिमिटेड (भेल) प्रकल्प आपल्या परिसरात आणला होता.

भेल (Bhel) कंपनीने सुमारे बारा वर्षांपूर्वी (२०१२) भंडारा जिल्ह्यात प्रकल्प उभा करण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पातून मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचेही आश्वासन दिले होते. याकरिता ५०० एकर जागेची मागणी केली होती. एमआयडीसीकडे तशी रितसर नोंदणी केली होती. शेतकऱ्यांनीसुद्धा भविष्याचा विचार करून आपली शेती कंपनीला देण्याची तयारी दर्शवली. कंपनीने या सर्व जागेच्या भोवती कुंपण घातले होते. मात्र बारा वर्षात प्रकल्प भूमिपजूनाचा मुहूर्तही जाहीर केला नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती.

डोळ्यासमोर शेती दिसत होती. मात्र, ती करता येत नव्हती. रोजगारही भेटला नाही आणि शेतीही गेली, यामुळे सर्वजण अस्वस्थ होते. परिणय फुके (Parinay Phuke ) भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झाल्यानंतर सर्वांनी त्यांच्याकडे तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार फुके यांनी याबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडली हेाती, वेळी सहा महिन्यांत निर्णय कळवतो, असे भेल कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतरही काहीच झाले नाही.

MLA Parinay Phuke
Maharashtra Political Updates : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल, असं कधी वाटलं नव्हतं : शरद पवार

परिणय फुके यांनी दोन वेळा लक्षवेधी मांडल्यानंतरही कंपनीने काहीच हालचाली सुरू केल्या नाहीत. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांसोबत आमदार फुके यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यानंतर कंपनीने सोलर प्लांट टाकण्याची तयारी दर्शवली. मात्र या प्रकल्पातून रोजगार निर्मिती होणार नसल्याने शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.

MLA Parinay Phuke
Maharashtra Politic's : वर्धापनदिनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे धक्के; बालेकिल्ल्यातील दोन युवा शिलेदार भाजपने फोडले

एमआयडीसीने भंडाराच्या बदल्यात ‘सोलर प्लांट’साठी मराठवाड्यात पर्यायी जमीन देण्याची तयारी दर्शवली. मात्र, भेल कंपनीने जमिनीवरचा आपला ताबा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे आमदार फुके यांनी शेतकऱ्यांना घेऊन थेट प्रकल्पासाठी राखीव असलेल्या शेतात जाऊन वखरणी आणि नांगरणी सुरू केली. विशेष म्हणजे या आंदोलनानंतर पाऊसही बरसला. आता जे काही व्हायचे ते होईल, जेव्हा प्रकल्प होईल, तेव्हा होईल. पण, तोपर्यंत शेती करण्याचा निर्धार या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com