Municipal Corporation Politics; MLA Kishor Jorgewar sarkarnama
विदर्भ

BJP Loss : निवडणुकीत आमदाराची मनमानी, उमेदवार बदलले, एबी फॉर्मही विकले; भाजपला मोठा फटका

Municipal Corporation Politics : चंद्रपूरमध्ये ६६ पैकी काँग्रेसचे ३० तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले असून नेत्यांमधील भांडणे आणि आमदारांच्या मनमानी करभाराचा फटका बसल्याचे दिसत आहे.

Rajesh Charpe

  1. भाजपमधील अंतर्गत भांडणे आणि तिकीट वाटपातील मनमानी पक्षाला महागात पडली.

  2. एबी फॉर्म घोटाळ्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होऊन मतदार नाराज झाले.

  3. जिल्ह्यातील नगरपालिका पाठोपाठ चंद्रपूर महापालिकाही भाजपच्या हातातून गेली.

Chandrapur News : नेत्यांमधील भांडणे आणि भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी तिकीट वाटप करताना केलेली मननमानी आणि त्यांचे कट्टर समर्थक असलेले बडतर्फ शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी केलेल्या एबी फॉर्म घोटाळ्याचा मोठा फटका भाजपला महापालिकेच्या निवडणुकीत बसला. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका पाठोपाठ भाजपला चंद्रपूर महापालिकासुद्धा हातची गमावावी लागली.

चंद्रपूरमध्ये ६६ पैकी काँग्रेसचे ३० तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले आहे. चंद्रपूरच्या जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्याच पक्षाला बहुमत दिलेले नाही. त्यामुळे दोन्‍ही पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे सेना ६, वंचित आघाडी २, शिंद सेना १, एमआयएम १ आणि दोन अपक्ष सदस्यांसोबत तडजोड करावी लागणार आहे.

मात्र उद्धव सेना काँग्रेससोबत जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे येथे आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यापासून तर उमेदवारी वाटप करेपर्यंत भाजपमध्ये मोठे वाद उफाळून आले होते. शेवटी प्रदेशाध्यक्षांना यात दखल द्यावी लागली होती. त्यांनीच प्रदेश कार्यालयातून भाजप उमेदवारांची यादी भाजप नेत्यांकडे पाठवली होती.

पण भाजपचे शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी या यादीतील काही उमेदवार परस्पर बदलले. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गंभीर दखल घेऊन तत्काळ कडक कारवाई केली. शहर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांना बडतर्फ केले. याचा विपरीत परिणाम मतदारांवर झाला. एवढेच नव्हे तर कासनगोट्टूवार यांनी बोगस पट्टे वाटप करीत नागरिकांची दिशाभूल केल्याचे प्रकरण निवडणुकीच्या प्रचारात समोर आले.

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची याची तक्रार करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिकेत भाजपचे ५० नगरसेवक निवडून येतील अशी वल्गना केली. तत्पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार जोरगेवार यांनी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. त्याची पूर्तीत वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांनी केली नाही.

भाजपमधील भांडणे, आमदारांनी दिलेली खोटी आश्वासने, पक्षाने उमेदवार ठरवले असताना १७ उमेदवारांची नावे वगळणे हे जनतेलाच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनासुद्धा पटले नाही. त्यांनी पक्ष आपल्या मालकीचा समजणाऱ्या नेत्यांना मतदानातून त्यांची जागा दाखवून दिली.

किशोर जोरगेवार यांना पक्षात घेतल्यापासून भाजपची शिस्त बघडली. आपसात मतभेद उफाळून आले, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपला वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठे ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे निष्ठावान कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

FAQs :

1. चंद्रपूर महापालिकेत भाजपचा पराभव का झाला?
अंतर्गत गटबाजी, तिकीट वाटपातील मनमानी आणि एबी फॉर्म घोटाळा ही मुख्य कारणे ठरली.

2. तिकीट वाटपावर कोणावर आरोप झाले?
भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर मनमानी केल्याचे आरोप झाले.

3. एबी फॉर्म घोटाळा म्हणजे काय?
उमेदवारी संदर्भातील अधिकृत एबी फॉर्मच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.

4. या पराभवाचा भाजपवर काय परिणाम होईल?
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक रचनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

5. भाजपने याआधी कोणती सत्ता गमावली होती?
महापालिकेपूर्वी जिल्ह्यातील नगरपालिका देखील भाजपच्या हातातून गेल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT