Kishor Jorgewar: मुनगंटीवार मागे हटेनात, मग वडेट्टीवारही भिडले अन् जोरगेवारांची झाली कोंडी! सभागृहात 'असं' घडलं नाट्य

Kishor Jorgewar enquiry: शासकीय निधीतून मित्राच्या बंगल्याला सीमाभिंत बांधून दिल्यावरुन किशोर जोरगेवार यांची शासकीय चौकशी होणार आहे.
Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwar
Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwarsarkarnama
Published on
Updated on

Kishor Jorgewar enquiry: चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वारांमध्ये आज पावसाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी झाली. शासकीय निधीतून आपल्या मित्राच्या बंगल्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ९५ लाखांचा शासकीय निधी खर्च केला आणि नाल्यावर संरक्षण भिंत बांधून दिली, असा थेट आरोप भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यानंतर या वादात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही उडी घेतली आणि जोरगेवारांना कोंडीत पकडलं. यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले. मात्र या भिंतीवरून चंद्रपूरचं राजकारण भविष्यात आणखी तापणार असल्याचं दिसून येतं आहे.

Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwar
Manisha Kayande: "'संविधान दिंडी', 'पर्यावरण वारी'वाले वारीत घुसलेले अर्बन नक्षल"; जनसुरक्षा कायद्याचा उल्लेख करत कायंदेंनी केली मोठी मागणी

आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या व्यावसायिक मित्राच्या बंगल्याला पुरापासून वाचवण्यासाठी ९५ लाख रुपये खर्चून नाल्यावर बांधलेली संरक्षक भिंत बांधून दिली. ही भिंत पावसाळी अधिवेशनात चर्चेचा विषय ठरली. या भिंतीमुळं नाल्याची नैसर्गिक रुंदी कमी झाल्यानं शेजारील वस्त्यांना धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना थेट सवाल करत, नाल्याची रुंदी अरुंद करणाऱ्या अभियंत्यांवर काय कारवाई करणार? या भिंतीमुळं पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.

Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwar
Babanrao Lonikar: "मृत्यूनंतरही माझी हाडं म्हणतील..."; शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधानानंतर लोणीकरांची सारवासारव

दुसरीकडं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेऊन ही भिंत लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही, तर श्रीमंताच्या बंगल्यासाठी बांधली गेली असल्याचा आरोप केला. ९५ लाखांचा फुकट खर्च करणाऱ्यांवर कारवाई होणार का? अशी विचारणा त्यांनी केली. हवेली गार्डन मार्गावरील या भिंतीवरून गेल्या दीड महिन्यापासून वाद सुरू आहे. आम आदमी पक्षाचे मयूर राईकवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष राजीव कक्कड यांच्या तक्रारीनंतर मृदा व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत जगताप यांनी चौकशी सुरू केली आहे. जगताप यांनी भिंतीची पाहणी करून अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले.

Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwar
Ashadhi Wari 2025: वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींचा फोटो आला समोर; पोलिसांची दहा पथकं रवाना

याचा अहवाल यायच्या आधीच मुनगंटीवार यांनी नाल्याची नैसर्गिक रुंदी कायम ठेवण्याची हमी मागितली. ते म्हणाले, "नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास शेजारील वस्त्यांना फटका बसेल. सरकार याबाबत काय करणार अशी विचारणा केली." यावर मंत्री राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी होईल आणि नाल्याची रुंदी तपासून आवश्यकता भासल्यास ती वाढवली जाईल असं उत्तर दिलं. उर्वरित बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडं प्रस्ताव पाठवला जाईल.

Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwar
Walmik Karad: वाल्मिकला मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता! जवळच्या सहकाऱ्याचे खळबळजनक आरोप; नेमकं काय घडलंय?

मात्र, मुनगंटीवार यांनी राठोड यांच्या 'सजेशन फॉर ॲक्शन' या उत्तरावर नाराजी व्यक्त केली आणि कारवाईची स्पष्ट हमी मागितली. त्यांनी विभागाच्या लेखी उत्तराचा हवाला देत निकटवर्तीयाला फायदा पोहचवण्याचा आरोप केला. यावर राठोड यांनी चौकशीचं आश्वासन दिलं. आमदार किशोर जोरगेवार यांनी वादग्रस्त भिंतीचा बचाव केला. नाल्या शेजारील झोपडपट्टीवासीयांच्या मागणीवरून ही भिंत बांधली गेली असा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते व्हायचं आहे, पण आमच्या पक्षाकडूनच प्रश्न उपस्थित होत असल्यानं आम्हाला विरोधी पक्षनेत्यांची गरज नसल्याचा टोला त्यांनी मुनगंटीवार यांना उद्देशून मारला. नाल्यासाठी आणखी तीन कामे प्रस्तावित असून, वडेट्टीवार मंत्रिपदावर असताना ९२ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या प्रकरणामुळं आमदार जोरगेवार अडचणीत सापडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com