Nagpur News : नागपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे दबंग नेते अशी ओळख असणारे माजी मंत्री सुनील केदार यांची आहे. पण आता भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी त्यांनी चॅलेंज देण्याचा सपाटाच लावला आहे. आता देखील सावनेर विधानसभा मतदारसंघातील विविध कारणांवरून आमदार देशमुख यांनी केदार यांना खुले आव्हान देताना डिवचले आहे. देशमुख यांनी मतदारसंघात यापूर्वी दबावाचे, अवैध धंद्याचे, गुंडागर्दीचे राजकारण होते. यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यामुळे नागपूर जिल्ह्याचे राजकीय राजकारण आता तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघ केदारांचा ओळखला जात होता. त्यांचा वावर संपूर्ण जिल्ह्यात होता. ते म्हणेल ती पूर्व दिशा असायची. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय सर्वस्वी केदार हेच घ्यायचे. त्यात कोणी फारसा हस्तक्षेप करत नव्हता. त्यांचा एकहाती राजकीय दबदाब होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी केदारांचा गड उध्वस्थ करत त्यांच्या राजकीय पराभव केला. यानंतर त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार केले केले जात आहेत. असाच सत्कार कळमेश्वर तालुक्यात करण्यात आला. यावेळी आमदार देशमुखांनी केदारांनाच अंगावर घेतले.
यावेळी आमदार देशमुख यांनी सर्वात आधी पाटणसावंगी येथे सुरू असलेला टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले. तर अवैध वाळू तस्कारांकडे आपला मोर्चा वळवताना, आपण काटोल विधानसभा मतदारसंघात लढण्यास इच्छुक होतो. मात्र देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी आपणा काटोलऐवजी सावनेरमध्ये निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या. मला हा मतदारसंघ देणे माझ्यासाठीही मोठा धक्का होता, असे देशमुख यांनी सांगितले.
पण नेते आणि कार्यकर्त्यांनींच माझ्या विजयाच्या प्रचाराची धुरा हाती घेत काम सुरू केले. मला पंधरा दिवसांच्या प्रचारात निवडूण आणले. माझे आजोबा कळमेश्वर येथे शिकण्यासाठी होते. त्यामुळे मी कळमेश्वरचा पुत्र आहे. कळमेश्वरच्या विकासासाठी नव्या योजना आखण्यात आल्या असून त्या आपण पूर्ण आपण करू, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.
कळमेश्वरला नागपूरचे सॅटेलाइट सिटी म्हणून आपण पुढे आणू. कळमेश्वर नागपूरपासून दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कळमेश्वरचा नागपूरचे सॅटेलाइट सिटी म्हणून आपण तत्परतेने विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कळमना बाजारात संत्रा, मोसंबीवर काटपद्धती होती. एका टनामागे शंभर किलोचा काटा मारला जात होता. तो आता बंद करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. विशेष म्हणजे कळमना कृषी उत्पन्न बाजारात समितीत केदारांचे पॅनेल निवडूण आले आहे.