Sudhir Mungantiwar 1 Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar : अधिवेशनाला येत असल्याचे निरोप; नाराज मुनगंटीवार नागपुरात असूनही 'अदृश्य'

BJP MLA Sudhir Mungantiwar Nagpur Winter Legislature Session Mahayuti government Cabinet : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नागपूरमध्ये असून देखील विधिमंडळ कामकाजात सहभागी झाले नाहीत.

Rajesh Charpe

Nagpur News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळाता समावेश करण्यात आलेला नाही. यानंतरही आपण नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार आहो असे त्यांचे म्हणणे आहे.

असे असले तरी हिवाळी अधिवेशनात ते दोन्ही दिवस अनुपस्थित राहिले. या दरम्यान ते नागपूरध्येच आहेत. विधानसभेत येणे टाळून ते आपण नाराज असल्याचे अप्रत्यक्षपणे भाजपला संदेश देत असल्याचे बोलले जात आहे.

महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडाळाच्या विस्तारापूर्वी आपला मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र शपथविधीच्या दिवशी त्यांना कोणीच निरोप दिला नाही. मंत्र्यांच्या यादीतही त्यांचा समावेश नव्हता. याचा मोठा धक्का मुनगंटीवर यांना बसला आहे. विस्ताराच्या दिवशी त्यांनी कोणाशीच संवाद साधला नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते सभागृहात येतील तेव्हा बोलतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र ते विधान भवनाच्या आवार येण्याचे टाळले. त्याऐवजी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेतली.

यावेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगून वेळ मारून नेली होती. मात्र त्यांच्या नाराजीची चर्चा भाजपच्या नेत्यांपर्यंत पोचली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सुधीर मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल आणि मोठी जबाबदारी दिली, या बाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

त्यानंतर मुनगंटीवर यांनी फडणवीस आणि माझ्यात काहीच चर्चा झाली नसल्याचे सांगून सर्वांनाच कोड्यात टाकले. आज अधिवेनाशच्या दुसऱ्या दिवशी ते सभागृहात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिवसभर ते विधान भवनाकडे फिरकले नाही. अनेकांना येत असल्याचे निरोपही त्यांनी दिले होते. या दरम्यान भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

मुनगंटीवार आर्य वैश्य समाजाच्या बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. सुधीर मुनगंटीवावर यांना डावलल्याने आर्य वैश्य समाजही नाराज आहे. याकरिता ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र बैठक कुठे घेण्यात आली, कोण, कोण उपस्थित होते आणि त्यात काय ठरले हे सर्वच गोपनीय ठेवण्यात आले आहे. भाजपच्या अनेक आमदारांना याबाबत विचारणा केली असल्याचे काहीच माहीत नाही असे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. एकूणच मुनगंटीवर आणि त्यांचे समर्थक भाजपवर नाराज असल्याची चर्चा विधानभवन परिसरात दिवसभर सुरू होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT