Uddhav Thackeray Nagpur : 'नेहरू-सावरकर करणं बंद करा'; ठाकरेंनी काँग्रेस अन् भाजपला फटकारलं

Uddhav Thackeray Congress BJP One Nation One Election Jawaharlal Nehru Vinayak Damodar Savarkar Nagpur Winter Legislature Session : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वन नेशन-वन इलेक्शन विधेयकासह पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सारवकर यांच्यावरून काँग्रेस-भाजप पक्षाला चांगलेच सुनावले.
Uddhav Thackeray 3
Uddhav Thackeray 3Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेतून वन नेशन वन इलेक्शन, नेहरू-सावरकर मुद्यांवर भाष्य केले.

विशेष करून काँग्रेस-भाजपने नेहरू-सावरकर करत बसू नका. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजप सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी देखील उद्धव ठाकरेंनी मागणी केली.

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि काँग्रेसला (Congress) जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावर चांगलेच सुनावले. ठाकरे म्हणाले, "भाजप-काँग्रेसने आता नेहरू आणि सावरकर, असे करत बसू नये. आताचा काळ आपल्याकडे बघतो आहे. त्यावेळी ते काय करायचे ते करून गेले. मोदींनी नेहरू-नेहरू करणं बंद करावे. ते आपापल्या जागी होते. आता आपण लोकांसाठी काय करणार आहोत, ते दाखवावं".

Uddhav Thackeray 3
Uddhav Thackeray Nagpur: 'भुजबळांबाबत आता तिकडं 'चैना-मैना' काही होणार नाही'; ठाकरे म्हणाले, 'ते संपर्कात...'

"सावरकरांना भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) लिहिलेल्या पत्रांची आठवण करून दिली. ते पत्र काय केराच्या टोपलीत गेले का? ही पत्र कधी, केव्हा लिहिली आहेत, ते माझ्याकडे तारखांसह आहे. फडणवीसांच्या या पत्रांची का दखल घेतली जात नाही. असे असेल, तर मग भाजपला सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही", असे देखील उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

Uddhav Thackeray 3
Nagpur Winter Session : सुर्यवंशी, देशमुख प्रकरणी विरोधक आक्रमक...पाहा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं

जनतेवर अशा निवडणुका लादू नका...

'वन नेशन वन इलेक्शन' बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने झाली पाहिजे. निवडणूक आयुक्त देखील निवडून आणला पाहिजे. मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला का घाबरता? लोकशाहीमध्ये मत कोणाला देत आहोत, ते कोणाला जात आहे, ते कळलेच पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया पारदर्शक, अशी झाली पाहिजे". तोपर्यंत 'वन नेशन वन इलेक्शन', राबवू नये. तशी ती होता कामा नये. महाराष्ट्रात जे घडले आहे, ते जनतेला पटलेले नाही. त्यामुळे अशापद्धतीच्या निवडणुका जनतेवर लादू नये, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

संसदेतील 'तो' फोटो हटवण्यावरून ठाकरे भडकले

विधिमंडळ परिसरात अधिवेशनाच्या काळात प्रवेशसाठी पास दिले जातात. त्यावर राजमुद्रा असते. 2023 पर्यंत ही राजमुद्रा होती. परंतु ती आता गायब आहे. यावर उद्धव म्हणाले, "हा सर्व प्रकार म्हणजे आपल्या लोकशाहीचे, कारभाराचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे". तसंच उद्धव ठाकरे यांनी संसदेतील हिंदुस्तानने पाकिस्तानविरुद्ध जिंकलेल्या बांगलादेशातील युद्धाच्या फोटो हटवल्यावरून संतापले.

पाकिस्तान में घुसंगे और केक खाके...

"बांगलादेशाचे युद्ध, लोकसभेतील फोटो संसदेतून उतरवला, हिंदुस्थानने पाकिस्तानावर विजय मिळवला, त्याच्या शौर्याचा प्रतिक आहे. सैनिक शहीद झाले आहेत. हिंदुस्थानने पाकिस्तानावर आपल्या सैनिकांनी विजय मिळवला होता. हे तोंडी खूप म्हणतात, 'घर में घुस के मारेंगे'. पण हे, 'पाकिस्तान में घुसंगे और केक खाके आते है', असे आहेत. हा फोटो काढून तिथं तुम्ही कोणता फोटो लावणार आहात? केंद्रातील आणि राज्यातील सरकारला लाज-लज्जा, शरम नाहीच", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com