Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

BJP Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आमदारांना दिले 'हे' टार्गेट!; 'देवगिरी'वर झाली महत्त्वाची बैठक

Lok Sabha Election 2024 BJP Maharashtra Preparation MLA's Meeting : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपने वाजवला बिगुल...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपने महाराष्ट्रातील आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. विधिमंडळ अधिवेशनात राजकीय वातावरण तापलेले असताना भाजप आमदारांची ही अतिशय महत्त्वाची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना या बैठकीत भाजपने दिल्या. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.

पुढील 55 दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे कामाला लागा अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भाजप आमदारांची ही बैठक झाली.

आजच्या बैठकीत आणि यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकांना दांड्या मारणाऱ्या आमदारांची कानउघाडणी करण्यातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक प्रकारे भाजप आमदारांची शाळा घेतल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप आमदारांना दिले टार्गेट?

बैठकीत भाजप आमदारांना नमो अॅपचे टार्गेट देण्यात आले आहे. येत्या 26 जानेवारीपूर्वी राज्यात 50 लाख नमो अॅप डाउनलोड करून घेण्याच्या सूचना देण्यात आला आहेत. प्रत्येक आमदाराला 30 हजार अॅप डाउनलोडचे टार्गेट दिले गेले.

तसेच आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटे द्यावीत. मतदरासंघात 150 बूथ प्रमुख तयार करावेत, असे आमदारांना सांगण्यात आले आहे. येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या शेवटी लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT