social media influencer booked over ethanol claims Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari Ethanol Case : नितीन गडकरींच्या नावाने इथेनॉलबाबत दिशाभूल? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा

FIR against influencer for misleading ethanol posts: नागपूर भाजप सोशल मीडिया सेलच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांची कारवाई; गडकरींचा प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

Pradeep Pendhare

Nitin Gadkari Ethanol Policy Controversy : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉलविषयक धोरणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत बिहारसह देशातील चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात बिहारमधील यूट्यूबर मनीष कश्यप याच्यासह 'देसी बॉयसर', हर्षित राठी आणि अंकलेश इन्वाटे यांचा समावेश आहे.

ही कारवाई नागपूर भाजप (BJP) सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष शिशिर अरुण त्रिपाठी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांनी संबंधितांविरुद्ध तपास सुरू केला असून, प्राथमिक चौकशीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेल्या काही व्हिडीओंमधून कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणारी आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचे आढळल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इन्फ्लुएन्सरनी यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर इथेनॉलचा वापर करून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या फसवणूक कशी करता येईल, बनावट व्यवहार कसे करता येतील आणि कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणारे व्हिडीओ प्रसारित केले.

तक्रारीनुसार, या व्हिडीओंमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉलविषयक धोरणाचा संदर्भ देण्यात आला. मात्र, त्या धोरणाचा चुकीचा अर्थ लावत नागरिकांच्या मुलाखतींद्वारे दिशाभूल करणारे आणि गडकरी यांची बदनामी करणारे कथित आशय प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे नागपूर सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संबंधित व्हिडीओंमध्ये त्यांच्या नावाचा आणि इथेनॉल धोरणाचा संदर्भ वापरण्यात आल्यामुळे तक्रार दाखल झाली असून, त्यानंतर चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT