Doctor Sejal Pawar controversy : ‘मृतदेहावर आक्षेपार्ह टिप्पणी’; प्रणीत मोरेनंतर KEMच्या विद्यार्थिनीवर सायबर पोलिसांची FIR

Maharashtra Cyber Police register FIR against comedian Praneet More and KEM medical student Sejal Pawar after controversial viral video sparks outrage : या नव्या वादात मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलशी रुग्णालयाशी संबंधित MBBS अंतिम वर्षाची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिचे नाव समोर आले आहे.
Doctor Sejal Pawar controversy
Doctor Sejal Pawar controversySarkarnama
Published on
Updated on

Mumbai viral controversy news : कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोवरून सुरू झालेला वाद आता आणखी गंभीर टप्प्यात पोहोचला आहे. 370 रुपयांच्या बिर्याणीवरील टिप्पणीमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रणीत मोरेच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत.

कारण त्याच्या शोमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या नव्या वादात मुंबईतील (Mumbai) किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) हॉस्पिटलशी रुग्णालयाशी संबंधित MBBS अंतिम वर्षाची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिचे नाव समोर आले आहे. शोदरम्यान तिने कथितपणे पुरुष मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

वाद वाढताच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी (Police) मोठे पाऊल उचलत डॉ. सेजल पवार आणि कॉमेडियन प्रणीत मोरे या दोघांविरोधात FIR नोंदवली आहे. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे.

Doctor Sejal Pawar controversy
MNS vs Jain Community : ‘मर्यादा ओलांडू नका’; जैन समाजाच्या युवा नेत्याचा मनसेचे संदीप देशपांडेंना थेट फोन करत इशारा

दरम्यान, कॉमेडी शोमध्ये मृतदेहांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर केईएम प्रशासनाने सेजल पवारवर तातडीने कारवाई करत तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या काळात तिला महाविद्यालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Doctor Sejal Pawar controversy
Shiv Sena UBT Faces Crisis Workers : एकनाथ शिंदे निधी देतात, काम देतात, तुम्ही काय देता? अंबादास दानवेंसमोर शिवसेना ठाकरे सेनेतील कार्यकर्त्यांचा संतापाचा स्फोट

चौकशी समिती सात दिवसांत अहवाल देणार

रुग्णालय प्रशासनाने विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून चर्चा केली आणि त्यानंतर तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सेजल पवारला बाजू मांडताना येणार

रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले की संबंधित विद्यार्थिनी अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे तिच्याशी संबंधित सर्व प्रक्रिया नियम आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हाताळल्या जातील. चौकशी समितीसमोर विद्यार्थिनीला तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल.

संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम

या चौकशीत सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेला परिणाम, विद्यार्थिनीचे वर्तन, प्राप्त झालेल्या तक्रारी आणि सार्वजनिक प्रतिक्रिया, अशा सर्व बाबींचा सखोल तपास केला जाणार आहे.

स्वतंत्र चौकशी समिती स्थापन

प्राथमिक स्तरावर काही आरोपांबाबत तथ्य समोर आल्याची माहिती असली तरी निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीसाठी विस्तृत समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून अहवालानंतर पुढील मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कायदेशीर कारवाईमुळे प्रकरण चिघळणार

एकूणच, प्रणीत मोरेच्या शोभोवती निर्माण झालेला वाद आता केवळ सोशल मीडिया चर्चेपुरता मर्यादित न राहता कायदेशीर आणि संस्थात्मक कारवाईपर्यंत पोहोचल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com