Shrirampur Schools Closed : श्रीरामपूर बंदचा तिसरा दिवस; 16 हजार विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांपासून दूर, गुन्हेगारीविरोधी लढ्याला नवे बळ

16,000 students join anti-crime bandh as MCOCA demand intensifies in Shrirampur : श्रीरामपूरमधील हाॅटेल व्यावसायिक आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर संताप कायम; 'मकोका'ची मागणी तीव्र, उद्या भव्य मोर्चाची तयारी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी होणार का?
Shrirampur schools closed due to bandh
Shrirampur schools closed due to bandhSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur crime protest latest updates: गुन्हेगारीचे विश्व उखडून फेकण्यासाठी, श्रीरामपूरकरांचा निर्धार कायम असून, आज बंदच्या तिसऱ्या दिवशी शहरातील तब्बल 16 हजार विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांना जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. हाॅटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूरकर एकटवले आहेत.

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या टोळ्यांवर 'मकोका'ची मागणी करत, अवैध धंद्यांची ठिकाण कायमची बंद करण्याची मागणी श्रीरामपूरकरांना लावून धरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूरकर या मागणीवर ठाम असल्याने, पोलिस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. या मागणीला आता आणखी धार चढली असून, शहरातील शाळांनी आज बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

श्रीरामपूरमधील (Shrirampur) युवा हाॅटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांची शनिवारी भर दुपारी क्षुल्लक कारणावरून निर्घृण हत्या झाली. या हत्येमुळे श्रीरामपूर चांगलेच हादरले. याचबरोबर श्रीरामपूरमधील गुन्हेगारी विश्व चर्चेत आले. गुन्हेगारांना, अवैध धंद्यांना पोसणाऱ्या मास्टर माइंडविरोधात मकोका अंतर्गत कारवाईसाठी श्रीरामपूरकरांनी थेट बेमुदत बंद आंदोलन पुकारले.

या आंदोलनाला सर्वसामान्य नागरी, व्यापारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाची धार कायम आहे. या आंदोलनात आता सर्व पक्षीय राजकीय स्थानिक नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आंदोलनाची धार आणखी तीव्र झाली आहे. श्रीरामपूरमधील गुन्हेगारी (Crime) उखडून काढण्यासाठी आज श्रीरामपूर शहरातील सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

Shrirampur schools closed due to bandh
Shrirampur Crime Protest :'टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती'; श्रीरामपूर हत्याकांडानंतर भाजपच्या महिला नेत्याचे खळबळजनक विधान

श्रीरामपूर नगरपालिका, रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांमधील तब्बल 16 हजार विद्यार्थी घरी थांबून आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. शाळा आणि महाविद्यालय बंदमुळे या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे.

Shrirampur schools closed due to bandh
Shrirampur Band : श्रीरामपूर हत्याकांडानंतर संताप; बंद दुसऱ्या दिवशीही कायम, 'बेग टोळी'वर मकोका लावा, आमदार ओगले कडाडले

उपनगरामध्ये आंदोलनाची हाक

श्रीरामपूर शहरातील उपनगरापर्यंत या आंदोलनाची छळ पोहोचली आहे. आज बेलापूर उपनगराने बेमुदत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाची वाढलेल्या तीव्रतेने जिल्हा पोलिस दल आणि राज्य सरकारकडून दखल घेतली जाऊ लागली आहे. पोलिस दलाने रात्री उशिरा श्रीरामपूर शहरातील अवैध ठिकाणांवर छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

गुंडांच्या ठिकाणांवर पोलिसांची छापेमारी

यात हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत असलेल्या गुंडांच्या ठिकाणावर छापे मारल्याचे सूत्रांची माहिती आहे. या छाप्यात पोलिसांनी अनेक धक्कादायक मुद्देमाल आढळून आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे श्रीरामपूरकरांच्या आंदोलनाची दिशा योग्य असल्याची चर्चा आता रंगली आहे.

Shrirampur schools closed due to bandh
Maharashtra Schools: महाराष्ट्रात 9 हजार शाळांमध्ये एकच शिक्षक; यूडायस प्लस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव

श्रीरामपूमध्ये उद्या मोर्चा

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, उद्या बुधवारी श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चासाठी श्रीरामपूरकरांनी जोरदार तयारी केली आहे. श्रीरामपूरमधील स्थानिक राजकीय नेते सहभागी होणार आहे.

पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष

परंतु या मोर्चात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहभागी व्हावे, अशी स्थानिक राजकीय नेत्यांची मागणी आहे. तसे त्यांना आमंत्रण देण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. या आंदोलनात मंत्री विखे पाटील सहभागी होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. मंत्री विखे पाटील काय भूमिका मांडतात आणि त्यावर श्रीरामपूरकरांचा कसा प्रतिसाद देतात, याची देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com